TRENDING:

खाकीच्या केबिनमध्ये 'लाखांचे' घबाड! 1 लाख घेताना साहेब अडकले, कपाड उघडताच एसीबीचे अधिकारी चक्रावले

Last Updated:

लाच घेताना रंगेहाथ अटक केल्यानंतर केबिनमध्ये झाडाझडती  घेण्यात आली,  झाडाझडतीदरम्यान 6 लाख 34 हजारांची रोख रक्कम एसीबीला सापडली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संकेत वरक, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई :  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत कुरार पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे, दरम्यान आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये ACB झाडाझाडती करताना वरिष्ठ निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये 6 लाख 34 हजर रुपये आढळले आहेत. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एका अन्य पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असून गुन्हा दाखल करण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडून तब्बल तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे.

advertisement

समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्याने तीन लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी दोन लाख रुपये यापूर्वीच तक्रारदाराकडून स्वीकारण्यात आले होते. मात्र उर्वरित एक लाख रुपयांची रक्कम देण्यास तक्रारदाराने नकार देत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला.

advertisement

झाडाझडतीदरम्यान 6 लाख 34 हजारांची रोख रक्कम

त्यानुसार बुधवारी रात्री तक्रारदाराकडून उर्वरित एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना कुरार पोलीस ठाण्याचे सीनियर पीआय संजीव तावडे आणि पीएसआय ज्ञानेश्वर जुन्नेला अटक करण्यात आली. लाच घेताना रंगेहाथ अटक केल्यानंतर केबिनमध्ये झाडाझडती  घेण्यात आली,  झाडाझडतीदरम्यान 6 लाख 34 हजारांची रोख रक्कम एसीबीला सापडली

सिनियर पीआय आणि पीएसआयला 23 तारखेपर्यंत एसीबी कोठडी

advertisement

या कारवाईनंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून, प्रामाणिकपणाचा बुरखा पांघरून नागरिकांकडून लाच उकळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा एसीबीकडून देण्यात आला आहे. कारवाईदरम्यान एसीबीच्या पथकाने आवश्यक पंचनामे करून रोख रक्कम जप्त केली असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. कुरार पोलीस स्टेशनच्या सिनियर पीआय आणि पीएसआयला 23 तारखेपर्यंत एसीबी कोठडी देण्यात आली आहे.

advertisement

नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

दरम्यान, मुंबईसारख्या महानगरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडूनच लाच मागितली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशा कारवायांमुळे भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा :

3 पट पैशांचे आमिष, मित्रानेच घातला 1 कोटी 28 लाखांना गंडा, जालन्यात धक्कादायक प्रकार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाचे दर तेजीत, डाळींब आणि आल्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

Baramati Crime : दहा तोळं सोनं अन् लग्नाचं अमिष, पुण्यात बोलवून धमकी; विक्रमच्या आईने शॉकिंग खुलासा! मृत्यू प्रकरणात ट्विस्ट

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खाकीच्या केबिनमध्ये 'लाखांचे' घबाड! 1 लाख घेताना साहेब अडकले, कपाड उघडताच एसीबीचे अधिकारी चक्रावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल