बुलढाणा जिल्ह्यात सुरूवातीला काहीच गावात नागरीकांना टक्कल पडत होते. मात्र आता या टक्कल व्हायरसची व्याप्ती वाढत चालली आहे. बुलढाण्यातील 11 गावात हा आजार पसरला आहे. बोंडगाव, कालवड, कठोरा,भोनगाव,मच्छीद्रखेड,हिंगणा वैजनाथ,घुई,तरोडा कसबा,माटरगाव, पहुरजीरा,निम्बी या गावांमध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 104 च्यावर पोहोचली आहे.त्यानंतर स्थानिक आरोग्य विभागाने नागरीकांची तपासणी करायला सूरूवात केली आहे. त्यात तपासणी अंती गावातील लोक वापरत असलेल्या पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य नसल्याचं प्रशासन सांगितले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वापरणेच बंद केले आहे. त्यामुळे आठवड्याभरापासून अनेक ग्रामस्थ अंघोळीविनाच आहेत. पण ग्रामस्थ जरी अंघोळी करत नसली तरी पिण्यासाठी नेमक्या कोणत्या पाण्याचा वापक करतायत.
advertisement
पिण्यासाठी कोणतं पाणी वापरतात?
या भागातील पाण्याचा स्त्रोत बोअरवेल आणि विहीर आहे. पण हे पाणी वापण्याजोग योग्य नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांनी वान धरणाकडे धाव घेतली आहे.वाण धरण (वारी हनुमान) हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवास प्राप्त झाला आहे.त्यामुळे याच पाण्याचा नागरीकांनी पिण्यासाठी तथा वापरण्यासाठी उपयोग करावा, अशा सूचना जिल्हा आरोग्य विभागाकडून नागरीकांना दिला आहे.
आरोग्य अधिकारी काय म्हणाले?
इतक्या मोठ्या प्रमाणावर टक्कल का व्हावं यासाठी आम्ही डर्मेटोलॉजिस्ट सर्वे करत आहोत. डर्मेटोलॉजिस्टच हेच म्हणणं आहे, फंगल इन्फेक्शनमुळे हे केस जातायत. त्यासाठी आम्ही विविध स्तरावर पाणी सॅम्पल पाठवत आहोत. हेवी मेटल त्याच्यात असण्याची शक्यता असेल तर ते तपासण्यासाठी आपण पाण्याचे नमुने पाठवले आहेत. याचे अहवाल 7-8 दिवसात येतील. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, साथ रोग अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी,डर्मोटोलॉजिस्ट, स्किन स्पेशालिस्ट असे सगळे मिळून या आजाराचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
