पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. बंटी जहागीरदार हा 2012 मधील पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला आरोपी होता. बंटी जहागीरदार हा आपल्या एका साथीदारासह स्कुटीवरून जात होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी बंटी जहागीरदारवर बेछुट गोळीबार केला होता. गोळीबारात जखमी झाल्यानंतर बंटी जहागीरदारला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. पण, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला.
advertisement
कोणत होता बंटी जहागीरदार?
अस्लम शबीर शेख उर्फ बंटी जहागीरदार (वय 53) हा अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये वॉर्ड क्रमांक 2 इथं राहत होता. जहागीरदारची पार्श्वभूमी ही राजकीय आणि गुन्हेगारी अशी होती. मुस्लिम समाजातील मोठं राजकीय प्रस्थ म्हणून त्याची ओळख होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होता मात्र 2017 सालापासून राष्ट्रवादी पासून अलिप्त होता. राजकारणात कुठेही सक्रिय नव्हता. बंटी जहागीरदार याची आई ही श्रीरामपूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका होत्या. आईच्या निधनानंतर वहिनी तरूनम शेख - जहागीरदार यांचा या ठिकाणी पोटनिवडणुकीत विजय झाला होता. सध्या 2025 च्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत चुलत भाऊ रईस शेख - जहागीरदार हे काँग्रेसच्या तिकीटावर प्रभाग 8 मधून विजयी झाले होते.
बंटी जहागीरदारवर अनेक गुन्हे दाखल
बंटी जहागीरदारच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर सावरूपाचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. ज्यापैकी काही प्रकरणात त्याला दोषमुक्त करण्यात आलं आहे आणि काहींच्या खटल्यांचे निकष अजून प्रलंबित आहेत. वर्ष 2017 मध्ये त्याविरुद्ध केलेले प्रतिबंध आदेशाचा खटला उच्च न्यायालयात रद्द झाला होता. त्याच्या विरोधात विविध गुन्हे फिर्याद (FIR) आणि कायदेशीर कार्यवाही नोंदली गेली आहे, ज्यात काही न्यायालयांनी त्याला दोषमुक्त केलं होतं आणि काही प्रकरणं अजून न्यायालयीन प्रक्रियेत आहेत.
श्रीरामपूर पोलीस ठाण्यात 14 , नेवासा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. तर पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात भादवि कलम 307 , 427 , 120 ( ब ) सह भारताचा स्फोटक कायदा 3,4,5 सह बेकायदा हालचाली प्रतिबंधक अधिनियम 16 व 18 ( जर्मन बेकरी साखळी बॉम्बस्फोटातील सहआरोपी होता. याच प्रकरणात पुन्हा मुंबई दहशतवादी पथकाकडून ( ATS ) मोक्का कायद्याखाली अटक केली होती. 2023 मध्ये जामिनावर बाहेर होता.
पोलिसांच्या ५ टीम मारेकऱ्यांच्या शोधात
श्रीरामपूरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितलं की, दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास बंटी जहागीरदार आणि त्याचा साथीदार हे दोघे स्कुटीवरून चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबारात जखमी झालेल्या बंटी जहागीरदार जखमी झाला होता. त्याला साखर कारखाना इथं दाखल करण्यात आलं होतं."
तसंच, "या प्रकरणी ५ टीम तयार करण्यात आल्या आहेत. लवकरच आरोपी हे पकडले जातील. लोकांनी शांतता राखावी कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, शांतता भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, असं आवाहन सोमनाथ घार्गे यांनी केली.
