TRENDING:

नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, 53 विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणारी बस उलटली

Last Updated:

किल्ले शिवनेरीवर पर्यटनासाठी आणि अष्टविनायक दर्शनासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ओतूरजवळ भीषण अपघात झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर पर्यटनासाठी आणि अष्टविनायक दर्शनासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ओतूरजवळ भीषण अपघात झाला आहे. बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजकाला (डिव्हायडर) जाऊन धडकली. या दुर्घटनेत १० ते १५ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
News18
News18
advertisement

सहलीचा आनंद विरला; ओतूरजवळ बसचा अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातून ५३ विद्यार्थी शिवनेरी किल्ल्याच्या सहलीसाठी निघाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीचे दर्शन घेऊन हे विद्यार्थी अष्टविनायक दर्शनासाठी जुन्नर तालुक्यात जाणार होते. मात्र, ओतूर शिवारात महामार्गावर चालकाचा बसवरील ताबा अचानक सुटला आणि भरधाव बस डिव्हायडरला जाऊन धडकली.

१० ते १५ विद्यार्थी जखमी

advertisement

हा अपघात इतका भीषण होता की बसमधील १० ते १५ विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने ओतूरमधील खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

५३ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

बसमध्ये एकूण ५३ विद्यार्थी प्रवास करत होते. सहलीच्या उत्साहात असलेल्या या विद्यार्थ्यांच्या बसला अचानक अपघात झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून बस चालकाची चौकशी केली जात असून, बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता की चालकाचा निष्काळजीपणा, याचा तपास ओतूर पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, 53 विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणारी बस उलटली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल