TRENDING:

Chandrapur: काँग्रेसचा गेमओव्हर? आंबेडकरांनी सूत्र फिरवली, 10 नगरसेवक निघाले मुंबईकडे; भाजप करणार मोठा गेम?

Last Updated:

चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेवरून हायहोल्टेज ड्रामा सुरू आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि 2 अपक्ष नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हैदर शेख, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेचा निकाल लागलापेक्षा काँग्रेसमधील वादाने यंदाची निवडणूक चांगलीच गाजली आहे. काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर असे दोन गट पडले आहे. काँग्रेस सत्ता स्थापन करणार असा दावा करतेय, पण १० नगरसेवकांनी आता मुंबईकडे कूच केली आहे.  शिवसेना उबाठा, वंचित बहुजन आघाडी आणि 2 अपक्ष नगरसेवक आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

advertisement

चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेवरून हायहोल्टेज ड्रामा सुरू आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि 2 अपक्ष नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले आहे. अकोला इथं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची या १० नगरसेवकांनी भेट घेतली. या भेटीनंतर हे नगरसेवक आता मुंबईकडे निघाले आहे. यामध्ये  सर्व दहा नगरसेवक मुंबईमध्ये  उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची शक्यता आहे. भाजप हा चंद्रपूरमध्ये दुसरा मोठा पक्ष आहे. भाजपकडे २३ जागा आहे. तर ठाकरे गट ६, वंचित आघाडी २, शिंदे गट १, बसपा १ आणि अपक्ष -२ अशी युती जर झाली तर ३४ चा आकडा गाठण्याची शक्यता आहे.

advertisement

काँग्रेसकडून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष याबाबत कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे सर्व 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  त्यामुळे भाजप-शिवसेना 24 आणि हे 10 नगरसेवक मिळून बहुमताचा आकडा  34 गाठण्याची शक्यता आहे. सत्तेच्या अगदी जवळ जाऊन देखील काँग्रेस सत्तेपासून वंचित राहण्याची यामुळे निर्माण शक्यता निर्माण झाली आहे.

advertisement

काँग्रेसमध्ये वाद निवळण्याची चिन्ह, पण...

दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये दुफळी उघड झाली आहे. गट नोंदणीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील नगरसेवकांनी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात दावे सादर केले, मात्र या नोंदणीवर विजय वडेट्टीवार गटाने आक्षेप घेतला आहे. यानंतर काँग्रेस मधील हा वाद थांबवण्यासाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा मध्यस्थी केली. त्यानंतर काँग्रेसने ते विजय वडेट्टीवार यांनी देखील काहीशी नमती भूमिका घेत धानोरकर यांनी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करावे असं वक्तव्य केलं होतं.  त्यानंतर धानोरकर यांनी चंद्रपूर मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

advertisement

आपल्याकडे 31 नगरसेवक असून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटही सोबत येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, गट नोंदणीतील नाव प्रदेशाध्यक्षांनी सर्व गटांना मान्य होईल असेच निश्चित केले होते, असं स्पष्टीकरणही खासदार धानोरकर यांनी दिलं.

चंद्रपूर महापालिका पक्षीय बलाबल - एकूण जागा 66

काँग्रेस -३०

भाजप- २३

ठाकरे गट- ०६

वंचित बहुजन आघाडी -०२

शिंदे गट शिवसेना- ०१

बहुजन समाज पार्टी - ०१

एम.आय.एम. - ०१

अपक्ष - ०२

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
सर्व पहा

 

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chandrapur: काँग्रेसचा गेमओव्हर? आंबेडकरांनी सूत्र फिरवली, 10 नगरसेवक निघाले मुंबईकडे; भाजप करणार मोठा गेम?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल