विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्र्यांच्या नावाबाबत धक्कातंत्राचा वापर केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांना मंत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आले. या दोन्ही नेत्यापैकी दिलीप वळसे पाटील यांना वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव मंत्री पद मिळणार नसल्याचे म्हटले जात होते. मात्र, भुजबळ यांचा समावेश निश्चित मानला जात होता.
advertisement
भुजबळ काय म्हणाले?
मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याचे म्हटले जात होते. तर, दुसरीकडे छगन भुजबळ यांना संधी नाकारल्याने ओबीसी संघटनांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी विविध ओबीसी संघटनांनी केली.
माजी मंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज सभागृहातील कामकाजात हजेरी लावली. सभागृहात येत असताना त्यांना पत्रकारांनी विविध प्रश्ने विचारली. मात्र, भुजबळ यांनी उत्तर देणे टाळले. मंत्रिपद न मिळाल्याने समाज नाराज आहे. तुम्ही समाजाची समजूत कशी घालणार, असे विचारले असता त्यांनी समाज सगळ्यांची समजूत घालेल, असे सूचक वक्तव्य केले. मंत्रिपदासाठी एक जागा रिक्त आहे, त्यावर काही चर्चा सुरू आहे, तुम्हाला काही अपेक्षा आहे का असे विचारले असता भुजबळांनी सांगितले की, मला काहीही अपेक्षा नाही असे स्पष्ट सांगितले.
भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने ओबीसी संघटना नाराज...
महायुतीला विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाचे मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. छगन भुजबळ हे ओबीसी समाजातील मोठे नेते आहे. भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, भुजबळांना वगळण्यात आल्याने ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली. भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी विविध संघटनांनी केली.