मिटमिटा भागात भेसळयुक्त खवा तयार करणारा कारखाना उघडकीस आला. दिवाळीनिमित्त शहरात मिठाईत लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या बाजारपेठेत मिठाई तयार करण्यासाठी वापरला जाणारा खवाच बनावट वापरला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. मिटमिटाच्या उस्मानिया कॉलनीत 'दिव्यांश मिल्क अँड डेअरी'त भेसळयुक्त खवा, अन्य मिठाई तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
Diwali Diet Tips - फराळाच्या नादात पोटाकडे दुर्लक्ष नको, आयुर्वेदिक चहानं पोट राहिल ताब्यात
advertisement
पोलिसांच्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकला. तेव्हा तिथे अस्वच्छ ड्रम आणि भांड्यांमध्ये खवा तयार करणं सुरू होतं. गिरेन सिंग बच्चनलाल सिंग याच्या 'दिव्यांश मिल्क अँड डेअरी प्रॉडक्ट'वर छापा टाकून जवळपास 6 क्विंटल बनावट खव्याचे साहित्य जप्त केलं.
भेसळयुक्त खवा कसा ओळखायचा?
खवा किंवा मिठाई खरेदी करण्यापूर्वी तुम्ही त्याची शुद्धता सहज तपासू शकता. शुद्ध आणि ताज्या खव्याचा पोत तेलकट आणि दाणेदार असतो. तुम्ही थोडासा खवा घ्या आणि तळहातावर घासलात आणि त्यात दाणेदार पोत असेल आणि त्यात तेलाचे काही अंश निघत असतील आणि थोडी गोड चव येत असेल तर तो शुद्ध खवा आहे, तसे नसेल तर त्यात भेसळ आहे. खवा घासल्यानंतर त्याची चव थोडी गोड होते आणि तो तेल सोडू लागतो. खव्याची शुद्धता ओळखण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.