Diwali Diet Tips - फराळाच्या नादात पोटाकडे दुर्लक्ष नको, आयुर्वेदिक चहानं पोट राहिल ताब्यात

Last Updated:

दिवाळी आली की फराळ आलाच पण आवडता फराळ खाण्याच्या नादात पोटाकडे दुर्लक्ष करु नका. आयुर्वेदिक चहानं पोटाचं आरोग्य ताब्यात राहिल.

News18
News18
मुंबई - सण-उत्सव आले की, तेलकट, गोड, चमचमीत पदार्थ खाल्ले जातात. फराळ म्हणजे सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट...भरपूर तेल, मैदा, तूप घालून फराळ तयार केला जातो, आणि इतकं चमचमीत, तेलकट रोज खाण्याची सवय नसते, त्यामुळे असे पदार्थ एकाचवेळी भरपूर खाल्ल्यानं पोट दुखतं, बिघडतं. पदार्थ आवडला की तो बऱ्याच प्रमाणात खाल्लाही जातो. अशा पदार्थांमुळे पोट बिघडण्याची शक्यता असते. अशावेळी अन्नामुळे तुमचं आरोग्य बिघडणार नाही, यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्यानुसार हर्बल चहा प्या.
दिवाळीत घरी अनेक पदार्थ बनवले जातात आणि मिठाई आणली जाते. काही वस्तू घरी आणल्या जातात तर
काही नातेवाईक आणतात. अशावेळी, पदार्थ प्रमाणात खा आणि तब्येत सांभाळा. हा हर्बल चहा प्यायल्यामुळे
ॲसिडिटी, ब्लोटिंग आणि गॅससारख्या समस्या दूर होतात.
advertisement
ह्या आयुर्वेदिक चहानं आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं, वजन नियंत्रणात राहतं आणि पोटाच्या समस्या
दूर होण्यासोबतच त्वचा चांगली होते. चांगली झोप येण्यासाठी हा चहा उपयुक्त आहे.
हा चहा आम्लपित्त आणि सूज दूर करतो, हार्मोन्स संतुलित करतो, थायरॉईड नियंत्रणासाठीही फायदेशीर आहे आणि रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी देखील प्रभावी आहे.
advertisement
आयुर्वेदिक चहा कृती -
आयुर्वेदिक चहा बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा बडीशेप, जिरे, धणे, एक चमचा सुक्या गुलाबाच्या पाकळ्या,
गोकर्णाची 2 फुलं, कढीपत्त्याची 7-10 पानं, पुदिन्याची 5 पानं, तुळशीची 3 पानं आणि एक इंच आलं घ्या.
सुमारे 350 मिली पाण्यात सर्व गोष्टी एकत्र करा आणि मंद आचेवर 6 ते 7 मिनिटं शिजवा. हे मिश्रण फक्त कोमट प्या. हा चहा पिण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी. हा आयुर्वेदिक चहा सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पिऊ शकता. ते प्यायल्यानंतर 30 ते 35 मिनिटांनंतरच काहीतरी खा.
advertisement
आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या या गोष्टीही लक्षात ठेवा -
- सणासुदीच्या काळात एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी कमी प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा.
- हा आयुर्वेदिक चहा जेवणानंतर एक तासानंही पिऊ शकता.
- पुदिना, कढीपत्ता आणि आलं मिसळून चहा बनवता येतो. यासाठी, तुम्हाला कढीपत्त्याची 7 ते 10 पानं, मूठभर पुदिना आणि आल्याचा एक छोटा तुकडा लागेल. सर्व गोष्टी एक ग्लास पाण्यात टाका, 3 मिनिटं शिजवा, गाळा आणि प्या.
advertisement
- रात्रीच्या जेवणात मिठाई खाण्याऐवजी दुपारच्या जेवणात खा. आपल्या आवडत्या गोष्टी खाताना,
रात्रीचं जेवण हलकं ठेवण्याचा प्रयत्न करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diwali Diet Tips - फराळाच्या नादात पोटाकडे दुर्लक्ष नको, आयुर्वेदिक चहानं पोट राहिल ताब्यात
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement