नेमकं प्रकरण काय?
वडगाव कोल्हाटी येथील एका ३५ वर्षीय विवाहितेच्या पतीने ओळखीच्या एका महिलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिचा फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवला होता. सामान्यतः अशा शुभेच्छांचं स्वागत केलं जातं, परंतु या प्रकरणात मात्र उलटं झालं. स्टेटस पाहिल्यानंतर संबंधित महिला संतप्त झाली. "तुझ्या नवऱ्याने माझं वाढदिवसाचं स्टेटस का ठेवलं?" असा सवाल करत तिने शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री थेट फिर्यादी विवाहितेचं घर गाठलं.
advertisement
घरी पोहोचल्यानंतर दोन्ही महिलांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. रागाच्या भरात असलेल्या त्या महिलेनं विवाहितेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच ती थांबली नाही, तर तिने सोबत आणलेल्या कटरने विवाहितेच्या उजव्या हातावर वार करून तिला गंभीर जखमी केले. तसेच, "तुला जिवे मारून टाकीन," अशी धमकी दिली.
या प्रकारानंतर जखमी विवाहितेने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोर महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
