TRENDING:

Sambhajinagar News : आजारपणापेक्षा बिलाचीच भीती जास्त, हॉटेलमध्ये राहणं स्वस्त, हॉस्पिटलची रूम मात्र महाग, कारण काय?

Last Updated:

Hospital Charges : छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी रुग्णालयांच्या खोलीभाड्यांचे दराबाबत धक्कादायक वास्तव्य समोर आलेले आहे. उपचारांच्या खर्चासोबत वाढत्या रूम चार्जेसमुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : आजारपण येते तेव्हा रुग्णालयात दाखल होणे ही गरज असते, पर्याय नसतो. मात्र शहरातील काही खासगी रुग्णालयांमधील खोलीभाडे पाहता उपचारांपूर्वीच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक ताणाची जाणीव होऊ लागली आहे.
‎उपचार की लक्झरी? खासगी रुग्णालयांच्या ‘रूम चार्ज’ने वाढवली धास्ती<br>‎
‎उपचार की लक्झरी? खासगी रुग्णालयांच्या ‘रूम चार्ज’ने वाढवली धास्ती<br>‎
advertisement

उपचारांपूर्वीच खिशाला कात्री

गेल्या काही दिवसांतील दरांचा आढावा घेतला असता काही हॉस्पिटलमधील 24 तासांचे 'रूम चार्ज' हे थेट पंचतारांकित हॉटेलच्या दरांशी स्पर्धा करताना दिसत आहेत. त्यामुळे उपचारांइतकीच ‘बिलाची’ चिंता कुटुंबियांना सतावत आहे.

‎रुग्णालयात दाखल झाल्यावर ऑपरेशन, औषधे किंवा उपचार यांची भीती वेगळीच असते,पण सध्या अनेकांना सर्वप्रथम विचार पडतो तो खोलीच्या दरांचा. काही ठिकाणी डिलक्स, एसी आणि सुपर डिलक्स रूमचे दर पाहिले असता ते शहरातील नामांकित हॉटेलच्या दरांइतकेच किंवा काही ठिकाणी त्याहून अधिक असल्याचे चित्र आहे.

advertisement

‎1) हॉटेलमधील दरांचा आढावा (गत आठवड्याचे दर)

‎डिलक्स रूम - 7000 रुपये

‎सुपर डबल रूम - 15500 रुपये

‎2) 3 आणि 4 स्टार हॉटेलमध्येही दर कमी नाहीत –

‎स्टँडर्ड डबल रूम - 4589 रुपये

‎सुपेरियर किंग रूम - 5500 रुपये

‎डिलक्स ट्विन रूम - 6647 रुपये

‎किंग रूम - 13600 रुपये

advertisement

‎डिलक्स रूम- 5050 रुपये

3) खासगी रुग्णालयांतील 24 तासांचे दर

‎सिडको परिसर

‎4) जनरल वॉर्ड (एमजेपीजेएवाय)

‎सेमी प्रायव्हेट (द्विन शेअरिंग) -3500 रुपये

‎सिंगल रूम- 6000 रुपये

‎सिंगल एसी रूम- 6500 रुपये

‎डिलक्स एसी-9000 रुपये

‎5) चिकलठाणा परिसर

‎सुपर डिलक्स - 5500 रुपये

‎डिलक्स -5000 रुपये

‎प्रायव्हेट एसी- 4500 रुपये

advertisement

‎प्रायव्हेट नॉन एसी - 4000 रुपये

‎सेमी प्रायव्हेट - 2100 रुपये

‎‎6) सिडकोतील अन्य रुग्णालये

‎डबल रूम - 3600 रुपये

‎सिंगल रूम - 4800 रुपये

‎7) उस्मानपुरा परिसर

‎सेमी प्रायव्हेट- 2900 रुपये

‎प्रायव्हेट -4850 रुपये

‎या दरांची तुलना केल्यास काही ठिकाणी हॉस्पिटल रूमचे भाडे हे 3 किंवा 4 स्टार हॉटेलच्या दरांच्या तोडीस तोड असल्याचे स्पष्ट होते. फरक इतकाच की हॉटेलमध्ये राहणे हा वैयक्तिक निर्णय असतो; पण रुग्णालयात दाखल होणे ही परिस्थितीजन्य गरज असते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव? कसं कराल व्यवस्थापन, सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

‎आरोग्य ही प्राथमिक गरज असताना वाढते रूम चार्जेस हे सर्वसामान्य कुटुंबांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत. उपचारांच्या खर्चासोबतच वाढत्या खोलीभाड्याचा भारही पेलावा लागत असल्याने, ‘आरोग्य सेवा की आर्थिक ओझे?’ असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sambhajinagar News : आजारपणापेक्षा बिलाचीच भीती जास्त, हॉटेलमध्ये राहणं स्वस्त, हॉस्पिटलची रूम मात्र महाग, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल