TRENDING:

महावीर जयंतीला ‘हे’ मार्ग बंद, छ. संभाजीनगरकर गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी रस्ते

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या मंगळवारी, 31 मार्च रोजी भगवान महावीर जयंती आहे. शहरात विविध उपक्रमांनी जयंती कार्यक्रम साजरा होत असतो. तसेच महावीर चौकातील स्मारकास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत. तर काही रस्ते बंद राहतील.
Chhatrapati Sambhajinagar: महावीर जयंतीला ‘हे’ मार्ग बंद, छ. संभाजीनगरकर गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी रस्ते
Chhatrapati Sambhajinagar: महावीर जयंतीला ‘हे’ मार्ग बंद, छ. संभाजीनगरकर गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी रस्ते
advertisement

महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महावीर चौक परिसरातील वाहतुकीत 31 मार्च रोजी पहाटे 5 ते सकाळी 11 वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. याबाबत वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरघे यांनी माहिती दिली.

‘पेट्रोल नाही, तर कशाला हवी गाडी?’ तरुणाने भररस्त्यात लावली काडी; छ. संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार

advertisement

हे मार्ग बंद राहतील

जालना रोडवरील लोखंडी पूल ते सेशन कोर्ट या मार्गावरून येणारी आणि जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असेल.

कार्तिकी सिग्नल ते पंचवटी चौक दरम्यान महावीर चौक उड्डाणपुलाखालून जाणारी -येणारी वाहतूक बंद राहील.

पर्यायी मार्ग कोणते?

रेल्वे स्टेशन ते बसस्थानक मार्गावरील सर्व वाहने महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) उड्डाणपुलावरून ये-जा करतील.

advertisement

रेल्वे स्टेशन ते छावणी, पडेगाव, अहिल्यानगर या मार्गावरील वाहने पंचवटी चौक मार्गे पुढे मार्गस्थ होतील.

जालना रोडकडून सेशन कोर्टमार्गे येणारी वाहने कोकणवाडी चौक, पंचवटी चौकमार्गे जातील.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

मध्यवर्ती बसस्थानक म्हणजेच कार्तिकी सिग्नलकडून येणारी वाहने महावीर चौक उड्डाणपुलाचा वापर करतील.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
महावीर जयंतीला ‘हे’ मार्ग बंद, छ. संभाजीनगरकर गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी रस्ते
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल