advertisement

‘पेट्रोल नाही, तर कशाला हवी गाडी?’ तरुणाने भररस्त्यात लावली काडी; छ. संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: गेल्या काही दिवसांत समाज माध्यमांत पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपांवर गर्दी होतेय.

‘पेट्रोल नाही, तर कशाला हवी गाडी?’ तरुणाने लावली काडी; छ. संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार
‘पेट्रोल नाही, तर कशाला हवी गाडी?’ तरुणाने लावली काडी; छ. संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगर: अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात तेलाचं संकट निर्माण झालंय. याचा फटका काही प्रमाणात भारतात देखील बसत असल्याचं चित्र असून काही ठिकाणी पेट्रोलसाठी रांगा लागल्या आहेत. या सगळ्या घडामोडीत छत्रपती संभाजीनगरात एकाने टोकाचा निर्णय घेतला. ‘पेट्रोल मिळत नसेल तर गाडी हवीच कशाला? म्हणत शरद गणपत भोजने याने भररस्त्यात स्वत:चीच गाडी पेटवून दिली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
नेमकं घडलं काय?
सध्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. याच अफवेतून सिल्लोड येथे शरद भोजने याने स्वत:ची दुचाकी पेटवून दिली. मात्र, त्याने हे कृत्य नशेत आणि स्टंटसाठी केल्याचं सांगितलं जातंय.
advertisement
दरम्यान, सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील म्हसला फाटा येथे त्याने दुचाकी पेटवली. रस्त्यावर दुचाकी पेटवल्याने काही काळ वाहतूक कोंडी आणि गोंधळ निर्माण झाला होता. याचा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पाण्याचे टँकर मागवून दुचाकीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरुळीत झाली.
अफवांवर विश्वास नको
गेल्या काही दिवसांत समाज माध्यमांत पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवा पसरत आहेत. मात्र, तशी कोणत्याही प्रकारची टंचाई नसून पंपावर पेट्रोल-डिझेल मिळत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकूर यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
‘पेट्रोल नाही, तर कशाला हवी गाडी?’ तरुणाने भररस्त्यात लावली काडी; छ. संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement