advertisement

सावधान! गॅस संपला म्हणून घरासमोरचं झाड तोडताय? तर चूक महागात पडेल, सरकारचा मोठा निर्णय

Last Updated:

Gas Shortage : गॅस टंचाईमुळे काही जण घरासमोरील झाडे तोडण्याचा पर्याय निवडत आहेत. मात्र सरकारने यावर कडक इशारा दिला आहे.

गॅस संपला म्हणून घरासमोरचं झाड तोडल्यास ५० हजारांच्या दंडासाठी तयार राहा
गॅस संपला म्हणून घरासमोरचं झाड तोडल्यास ५० हजारांच्या दंडासाठी तयार राहा
ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या आखाती देशांमधील युद्धामुळे संपूर्ण देशभरात एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाला आहे. यावरती राज्यातील अनेक शहरातील किंवा गावातील नागरिक चुलींवरती आता जेवण बनवताना दिसून येत आहे. मात्र याचा मोठा फटका पर्यावरणाला बसत आहे. जर तुम्हीही चुलीसाठी लागणारे लाकूड घेण्यासाठी झाड तोडत असाल तर ते तुम्हाला महागात पडणार आहे.
घराजवळचं झाड तोडणं ठरू शकतं महाग
आखाती युद्धाचा परिणाम हा देशभरातली सर्वसामान्यांना झालेला असून हॉटेल व्यवसायावर झाला असून सिलिंडर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हॉटले व्यावसायिकांनी आता चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम हा शहरालगच्या भागात सकाळ, संध्याकाळ धुराचे लोट दिसत असून या वाढत्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात अतिशय मोठ्या प्रमाणात सध्या वृक्षतोड सुरु झाली आहे. जळणासाठी उपयुक्त असणारी बाभळी तर धावडा,साग असे अनेक झाडे रात्रीच्या वेळी तोडली जात आहेत.
advertisement
झाड तोडणाऱ्यांवर सरकारची करडी नजर
या पार्श्वभूमीवर इंधनाच्या नावाखाली होणारी बेकायदेशीर वृक्षतोड पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहे. विनापरवाना झाडे तोडणाऱ्यांवर तसेच लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाचे भरारी पथक लक्ष ठेवून आहे. दोषी आढळल्यास दंडासह कडक कारवाई केली जाईल,अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण चिखले यांनी दिली.
विनापरवाना वृक्षतोड केल्यास काय कारवाई होते?
1)लक्षात ठेवा कोणतेही झाड तोडण्यापूर्वी वनविभागाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. जर झाड वाळलेले किंवा पडण्याच्या स्थितीत असेल तरीही त्यासाठी रीतसर अर्ज करावा लागतो. शिवाय तोडलेल्या लाकडाची दुसऱ्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी सुद्धा वनविभागाचा वाहतूक परवाना असणे आवश्यक आहे. जर हा परवाना नसेल तर ही लाकूड वाहतूक बेकायदा मानली जाते.
advertisement
2) वृक्षतोड रोखण्यासाठी कायद्यात अनेक कडक तरतुदी दिलेल्या आहेत. त्यात महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबतचे अधिनियम 1964 नुसार विनापरवाना झाड तोडल्यास तब्बल 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हा कायदा खासगी आणि सरकारी दोन्ही जमिनींवरील झाडांना लागू होतो.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
सावधान! गॅस संपला म्हणून घरासमोरचं झाड तोडताय? तर चूक महागात पडेल, सरकारचा मोठा निर्णय
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement