TRENDING:

वाहनांच्या गोडाऊनमध्ये भीषण आग, एकापाठोपाठ अनेक स्फोट, छ.संभाजीनगरमधला घटनास्थळाचा VIDEO

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रोडवर असलेल्या एका गाड्यांच्या गोडाऊनला दुपारच्या सुमारास आग लागली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैठण रोडवर असलेल्या एका गाड्यांच्या गोडाऊनमध्ये गाड्यांना अचानक आग लागली. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणाता सीएनजी रिक्षा होत्या. आग लागल्यानंतर स्फोटांचे आवाज ऐकून आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रोडवर असलेल्या एका गाड्यांच्या गोडाऊनला दुपारच्या सुमारास आग लागली. या गोडाऊनमध्ये सीएनजी रिक्षा मोठ्या प्रमाणात होत्या. अचानक आग लागली आणि एक एक करत अनेक गाड्यांना आग लागली.

advertisement

[video width="848" height="478" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-24-at-17.26.37-2026-03-5edf01d40d855ad7a465e577e475bee6.mp4"][/video]

सीएनजी रिक्षा असल्याामुळे आगीने काही क्षणात रौद्ररुपधारण केलं.  सीएनजीमुळे मोठा स्फोट होत असल्याने आग वाढत होती. दूरपर्यंत धुराचे लोट दिसून येत होते. स्थानिकांनी आगीची माहिती तातडीने अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. पण, या आगीमध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.  अग्निशमन दलाच्य्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समोर येऊ शकलं नाही. पण, नव्या कोऱ्या सीएनजी रिक्षांचं मोठं नुकसान झालं आहे.

advertisement

ट्रॅव्हलर बसला भीषण आग, प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाच्या दरात मोठी उलथापालथ, केळी भाव घसरले, कांद्याची काय स्थिती?
सर्व पहा

दरम्यान, अहिल्यानगर महामार्गावर अशीच एक आगीची घटना घडली. पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रॅव्हलर बसला लोणीकंद जवळ अचानक भीषण आग लागली होती. धावत्या बस मध्ये इंजिनमधून धूर निघत असल्याचं चालकाच्या लक्षात येताच त्याने तात्काळ प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. यानंतर चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. काही प्रवाशांनी परिस्थितीची तीव्रता पाहून काचा फोडून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
वाहनांच्या गोडाऊनमध्ये भीषण आग, एकापाठोपाठ अनेक स्फोट, छ.संभाजीनगरमधला घटनास्थळाचा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल