समोर आलेल्या माहितीनुसार, दिपाली पाटील जामखेडमध्ये एका कलाकेंद्रात नृत्यांगणा म्हणून काम करत होती. सध्या ती मैत्रीणीसोबत जामखेडच्या तपेश्वर भागात भाड्याने राहत होती. मैत्रिणीला बाजारात जाऊन येते सांगून दिपाली घराबाहेर पडली. मात्र बराच वेळ झाल्याने दिपाली घरी न आल्याने मैत्रीणीला तिची चिंता वाटू लागली. मैत्रिणीने दिपाली ज्या रिक्षाने बाजारात गेली त्या रिक्षावाल्याला फोन करून चौकशी केली. चौकशीत रिक्षावाल्याने दिपालीला खर्डा रोडवरील एका लॉजवर सोडल्याचे सांगितले.
advertisement
जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रिक्षावाल्याने सांगितल्याप्रमाणे मैत्रीणी संध्याकाळी साडेपाच वाजता त्या लॉजवर पोहचली. फोन करूनही मैत्रीण फोन उचलत नव्हती, अखेर दरवाजा ठोठवाला मात्र कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर वेटरला सांगून दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला तर आत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले . त्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवला आणि जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. नृत्यांगणा दीपालीने आत्महत्या का केली? हे अजून स्पष्ट झाले नाही. पण या प्रकरणी तिची मैत्रिण हर्षदा रवींद्र कामठे हिच्या तक्रारीनुसार जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
रोहित पवारांकडून शंका उपस्थित
जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलं नाही आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी. यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
हे ही वाचा :
