भाजपचा संदिप गायकवाड हा दिपाली पाटीलवर लग्नासाठी वारंवार दबाव टाकत होता . संदीप गायकवाड हा स्वतः विवाहित असताना तो दिपालीवर लग्नासाठी दबाव टाकत होता. त्यामुळे दिपालीने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. दिपाली देखील विवाहित होती, मात्र ती तिच्या पतीशी पटत नसल्याने माहेरी दोन मुलांसोबत राहत होती. कल्याण येथे दिपालीची आई ही तिच्या दोन मुलांसोबात राहत होती.घरी कमावणारी व्यक्ती कोणी नसल्याने दिपालीने कला केंद्रात काम करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
दिपाली पाटीलने कला केंद्र का सोडलं?
घुंगरू कला केंद्राचे चालक अरविंद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली पाटील ही अतिशय गरीब कुटुंबातील असून उदरनिर्वाह भागवण्यासाठी कला केंद्रावर काम करत होती. मात्र, मागील तीन महिन्यांपासून तिने घुंगरू हे कला केंद्र सोडून दिलं होतं. दिपाली पाटील या मूळच्या कल्याणमधील आहेत त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आमच्या कला केंद्रात आल्या होत्या. मात्र तीन महिन्यापूर्वीच त्यांनी कला केंद्र सोडले होते. सध्या त्या आमच्याकडे नव्हत्या. दिपाली पाटील परिस्थितीने खूप गरीब होत्या.
सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी
जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचारात रोहित पवार यांनी भाजपवर टीका करताना नगरपरिषद निवडणुकीत भाजपने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली असल्याचे वारंवार म्हटलं होतं. त्यातच आता त्यांच्याच उमेदवाराच्या पतीने दबाव टाकल्याने एका नर्तिकेना आत्महत्या केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. रोहित पवारांनी ट्विट करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा :
