भाजपकडून सातत्याने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांमधील घराणेशाहीवर जोरदार टीका करण्यात येते. आता, मात्र भाजपच्या नेतृत्त्वात असणाऱ्या सरकारमध्येही घराणेशाही दिसून येत आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे वडील, काका हे राजकारणातील दिग्गज व्यक्तीमत्त्व राहिले आहेत. त्यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांची मुले पुढे घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना घराणेशाही मोडून काढण्याचा निर्धार नव्हे संकल्प केला होता.
advertisement
महायुती सरकारमध्ये घराणेशाहीची छाप
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांचे चिरंजीव आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे इंद्रनील नाईक यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची कन्या मेघना बोर्डिकर यांचीदेखील मंत्रिमंडळात वर्णी लागली. भाजपच्या सुरुवातीच्या काळातील ज्येष्ठ नेते दिवगंत नेते पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आकाश फुंडकर यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली. तर, शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांनीदेखील शपथ घेतली. शिवसेना-काँग्रेस असा राजकीय प्रवास केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळाली.
त्याशिवाय अभयसिंहराजे यांचे पुत्र शिवेंद्रसिंह, शिवाजीराव देसाई यांचे पुत्र शंभूराजे देसाई, मोरेश्वर सावे यांचे पुत्र अतुल सावे, बाळासाहेब विखे-पाटील यांचे पुत्र राधाकृष्ण विखे-पाटील यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली. जनसंघाचे दिवगंत नेते गंगाधर फडणवीस यांचे पुत्र आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे पुतणे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे-पालवे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
CM फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी?
क्रमांक | नाव | मंत्रिपद |
---|---|---|
1 | देवेंद्र फडणवीस | मुख्यमंत्री |
2 | एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री |
3 | अजित पवार | उपमुख्यमंत्री |
4 | चंद्रशेखर बावनकुळे | कॅबिनेट मंत्री |
5 | राधाकृष्ण विखे पाटील | कॅबिनेट मंत्री |
6 | हसन मुश्रीफ | कॅबिनेट मंत्री |
7 | चंद्रकांतदादा पाटील | कॅबिनेट मंत्री |
8 | गिरीश महाजन | कॅबिनेट मंत्री |
9 | गुलाबराव पाटील | कॅबिनेट मंत्री |
10 | गणेश नाईक | कॅबिनेट मंत्री |
11 | दादा भुसे | कॅबिनेट मंत्री |
12 | संजय राठोड | कॅबिनेट मंत्री |
13 | धनंजय मुंडे | कॅबिनेट मंत्री |
14 | मंगलप्रभात लोढा | कॅबिनेट मंत्री |
15 | उदय सामंत | कॅबिनेट मंत्री |
16 | जयकुमार रावल | कॅबिनेट मंत्री |
17 | पंकजा मुंडे | कॅबिनेट मंत्री |
18 | अतुल सावे | कॅबिनेट मंत्री |
19 | अशोक उईके | कॅबिनेट मंत्री |
20 | शंभुराज देसाई | कॅबिनेट मंत्री |
21 | आशिष शेलार | कॅबिनेट मंत्री |
22 | दत्तात्रय भरणे | कॅबिनेट मंत्री |
23 | आदिती तटकरे | कॅबिनेट मंत्री |
24 | शिवेंद्रसिंह राजे भोसले | कॅबिनेट मंत्री |
25 | माणिकराव कोकाटे | कॅबिनेट मंत्री |
26 | जयकुमार गोरे | कॅबिनेट मंत्री |
27 | नरहरी झिरवळ | कॅबिनेट मंत्री |
28 | संजय सावकारे | कॅबिनेट मंत्री |
29 | संजय शिरसाट | कॅबिनेट मंत्री |
30 | प्रताप सरनाईक | कॅबिनेट मंत्री |
31 | भरत गोगावले | कॅबिनेट मंत्री |
32 | मकरंद पाटील | कॅबिनेट मंत्री |
33 | नितेश राणे | कॅबिनेट मंत्री |
34 | आकाश फुंडकर | कॅबिनेट मंत्री |
35 | बाबासाहेब पाटील | कॅबिनेट मंत्री |
36 | प्रकाश आबिटकर | कॅबिनेट मंत्री |
37 | माधुरी मिसाळ | राज्यमंत्री |
38 | आशिष जयस्वाल | राज्यमंत्री |
39 | पंकज भोयर | राज्यमंत्री |
40 | मेघना बोर्डीकर | राज्यमंत्री |
41 | इंद्रनील नाईक | राज्यमंत्री |
42 | योगेश कदम | राज्यमंत्री |