अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात धनजंय मुंडेंनी महापुरूषांवरूनही वक्तव्य केलं. सर्व जातींनी महापुरूषांची वाटणी केल्याचं दृश्य विदारक असल्याचं मुंडेंनी सांगितलं. शिवरायांनी एका जातीचं नव्हे तर रयतेचं राज्य निर्माण केलं होतं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला फक्त मराठा समाजाने साजरी करायची का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनी साजरी करायची का? महात्मा फुले यांची जयंती फक्त माळी समाजाने साजरी करायची का? शिक्षणाची चळवळ महात्मा फुले यांनी सुरू केली म्हणून फक्त माळी समाजातील लोकांनी शिक्षण घ्यायचे का..? भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने साजरी करायची का? असा सवाल उपस्थित केला.
advertisement
अंजली दमानियांनी मुंडेंवर जोरदार हल्लाबोल
धनंजय मुंडेंनी महापुरूष आणि पोलिसांच्या आडनावांवरून उपस्थित केलेल्या मुद्याचा त्यांच्या विरोधकांनी जोरदार समाचार घेतला. धनंजय मुंडेंवर बोलणं म्हणजे वेळ वाया घालणं, असा टोला मनोज जरांगे पाटलांनी लगावला. मराठा समाजाच्या वाट्याला जावू नका, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला. तर दोष आडनावात नसतो, असं म्हणत अंजली दमानियांनी मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला.
जातीयवाद प्रचंड प्रमाणात वाढला
बीड जिल्ह्यात मागील काही वर्षात जातीयवाद प्रचंड प्रमाणात वाढलाय. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी व्होट बँकेचं राजकारण टाळून सामाजिक भान जपत सर्व समाजात सौहार्द कसा निर्माण होईल? यावर लक्ष देण्याची गरज आहे.