TRENDING:

हिवाळ्यात खिशाला कात्री, ड्रायफ्रूट्सच्या दरात इतक्या टक्क्यांनी वाढ, पण किंमती का वाढल्या?

Last Updated:

विविध प्रकारच्या सुकामेव्याच्या दरात वाढ ही १५ ते २० टक्क्यांनी  झाली आहे. त्यामुळे सध्या सुकामेव्याचा बाजार तेजीत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : सध्या हिवाळा सुरू आहे आणि यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या सुकामेव्याला मागणी वाढली आहे.  त्यामुळे विविध प्रकारच्या सुकामेव्याच्या दरात वाढ ही १५ ते २० टक्क्यांनी  झाली आहे. त्यामुळे सध्या सुकामेव्याचा बाजार तेजीत आहे.
advertisement

दोन वर्षे सातत्याने सुकामाव्याचे दर कमी होते; परंतु यंदा ग्राहकांना काही प्रमाणात सुकामेवा महाग खरेदी करावा लागत आहे. सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना याची झळ बसत आहे परंतु यंदा थंडी जास्त असल्याने नागरिक सुकामेवा खरेदी कडे भर देत आहेत. बाजारात बदाम, खोबरे, अंजीर , अक्रोड, मनुका, पिस्ता, काजू, डिंक, खोबरे, मागणीत वाढ झाली आहे. हिवाळ्यात सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात. शरीरातील कॅलरीची गरज पूर्ण होते. यातून मिळणारे पोषक तत्त्व शरीराला उपयोगी पडतात तसेच सुका मेव्याचे लाडू बनवले जातात.

advertisement

वातावरणाच्या परिणामामुळे उत्पादनात घट 

मार्चमध्ये नवीन पीक आल्यानंतर दरात घट होईल. इराण युद्धामुळे खजूर, काळा मनुका, अंजीर, केसर, शहाजिरा दरात वाढ झाली आहे. दरात अंदाजे १५-२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयात होत असलेला सुकामेवा महागच येत आहे. भारतात वाढती मागणी अतिउष्णता, अनियमित पर्जन्यमानामुळे काजूचे जागतिक उत्पादन घटले आहे.

जानेवारी अखेरपर्यंत दर कायम राहणार

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कामाचा ताण अन् अपुरी झोप, सतत जाणवतोय थकवा, वेळीच घ्या ही काळजी
सर्व पहा

बदाम, अंजीरचे दर हे वाढले असून अफगाणिस्तानमधून येणारे सुका मेवा आहे. त्याचे दर हे वाढले आहेत. तर काजूचे दर हे काही प्रमाणात कमी झाले. इराण युद्धामुळे दरावर परिणाम झाल्याच पाहिला मिळत आहे. बदाम हे होलसेलमध्ये 850 रुपये किलो आहे. काळा मनुका 250 ते 450 रुपये किलो आहे अंजीर 900 ते 1200 रुपये किलो झाला आहे, अशी माहिती सुकमेवा व्यापारी सर्वेश अग्रवाल यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हिवाळ्यात खिशाला कात्री, ड्रायफ्रूट्सच्या दरात इतक्या टक्क्यांनी वाढ, पण किंमती का वाढल्या?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल