TRENDING:

जुन्या मुंबई-पुणे हायवेवरून जात असाल तर सावधान, भरदिवसा घडतोय भयंकर प्रकार, धडकी भरवणारा VIDEO

Last Updated:

जुना पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांसोबत धक्कादायक प्रकार घडत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गणेश दुडम, प्रतिनिधी मावळ: जुना पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना दिवसाढवळ्या लुटलं जात आहे. कार अडवून बँकेचं लोन घेतल्याचं कारण सांगून त्यांची लूट केली जात आहे. एका कार चालकाच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
लोणावळ्याजवळ दिवसाढवळ्या लुटीचा प्रकार
लोणावळ्याजवळ दिवसाढवळ्या लुटीचा प्रकार
advertisement

लोणावळ्याजवळ कार चालकांना टार्गेट करणारी एक धक्कादायक टोळी सक्रिय झाली असून बनावट बँक लोनचा बहाणा करून लूट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आलं आहे. एका जागरूक कार चालकानं प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

संबंधित चालकाने काही दिवसांपूर्वीच Cars 24 कडून जुनी ह्युंदाई वेरना कार खरेदी केली होती. लोणावळ्याजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन दुचाकीवरून आलेल्या पाच अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला. एका निर्जन ठिकाणी या व्यक्तींनी चालकाला जबरदस्तीने गाडी थांबवण्यास भाग पाडलं. गाडी थांबवताच, या कारवर आयसीआयसीआय बँकेचे १० लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे, असा दावा करत या तरुणांनी चालकावर दबाव टाकण्यास सुरुवात केली.

advertisement

तसेच कार ओढून नेण्याची धमकी देऊन ते चालकाला बाहेर येण्यास सांगत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने गाडीचा दरवाजा उघडला नाही किंवा काचही पूर्ण खाली केली नाही. त्याने तातडीने पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पोलीस येत असल्याचे समजताच संशयित आरोपींनी तेथून पळ काढला.

[video width="720" height="534" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-24-at-12.19.27-1-2026-03-212ac2ff691d59984417bfb86a2a2198.mp4"][/video]

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे दर घसरलेलेचं, लिंबू खातंय चांगलाच भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

या घटनेनंतर पडताळणी केली असता, गाडीवर कोणतंही कर्ज थकीत नसल्याचं स्पष्ट झालं. हा सर्व प्रकार कारच्या डॅश बोर्डवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. मात्र या प्रकरणी कार चालकाने कोणतीही फिर्याद लोणावळा पोलिसांत दिली नसल्याने उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अशी कोणती घटना घडली आहे का? याचा तपास लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जुन्या मुंबई-पुणे हायवेवरून जात असाल तर सावधान, भरदिवसा घडतोय भयंकर प्रकार, धडकी भरवणारा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल