माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शक्तीपीठ बाधित शेतकरी त्यांच्यासह कुटुंबासह बैलगाडी घेऊन सहभागी झाले होते..
शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, परभणी, सोलापूर, धाराशिव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग ते गोवा असा हा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे...
advertisement
काय आहे शक्तिपीठ महामार्ग?
राज्यातील दुसरा महत्वाकांक्षी सुपर एक्स्प्रेस वे 802 किमी लांबीचा,6 लेनचा द्रुतगती मार्ग
शक्तिपीठ महामार्ग उभारणीसाठी 86 हजार कोटी खर्च शक्तिपीठ महामार्ग सहा पदरी असणार आहे.
कुठे कुठे रास्ता रोको आंदोलन?
परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात,शिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात या आंदोलन करण्यात आलं. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय,शांत बसणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. तर धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी एकवटला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा ही अशी मागणी करत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून घोषणाबाजी केली.
सरकारची मोठी कसोटी
अधिवेशनातही शक्तिपीठ महामार्गप्रकरणी अधीवेशनात आवाज उठवण्याचा निर्धार विरोधकांनी केला आहे. शक्तीपीठ महामार्ग हा सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच तयार केला जाईल अशी सरकारची भूमिका आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर,सांगली,परभणी आणि धाराशिवमध्ये या महामार्गाला तीव्र विरोध होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा महामार्ग तयार पूर्ण करताना सरकारची मोठी कसोटी लागणार आहे.
