TRENDING:

पोलीस स्टेशनसमोर तुंबळ हाणामारी, एकमेकांना उचलून आपटले, मारामारी सोडवताना पोलिसांना नाकी नऊ

Last Updated:

जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. अगदी एकमेकांना उचलून आपटण्यापर्यंत वाद झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी, कोल्हापूर :  कोल्हापूरच्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. कुठल्याशा कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. एकमेकांना उचलून आपटण्यापर्यंत दोन्ही बाजूचे लोक आक्रमक झाले होते.
कोल्हापूर- जयसिंगपूर पोलीस स्टेशनसमोर दोन गटात हाणामारी
कोल्हापूर- जयसिंगपूर पोलीस स्टेशनसमोर दोन गटात हाणामारी
advertisement

अखेर जमावा पांगवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सुरुवातीला दरडावून सांगूनही जमावाने ऐकले नाही. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाला पांगवण्याचे प्रयत्न केले. परंतु वाद सोडवताना आणि जमावाला पांगवताना पोलिलांच्या नाकी नऊ आले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंब आणखी महागले, शेवगा आणि गुळाची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, दोन गटातील वाद नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. दोन्ही गटातील काही व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोलीस स्टेशनसमोर तुंबळ हाणामारी, एकमेकांना उचलून आपटले, मारामारी सोडवताना पोलिसांना नाकी नऊ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल