गडचिरोली : महाराष्ट्राचा शेवटचा टोक विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सज्ज झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अशा सिरोंचा तालुक्यात उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीनशे खाटाच्या अत्याधुनिक सोयीने सुसज्ज असलेल्या रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय अशा भव्य शैक्षणिक संकुलाच्या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा होणार आहे. यामुळे तीन राज्याचा सीमावर्ती भाग विकासाच्या कक्षेत येणार आहे
advertisement
गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुका हा तीन राज्याचां सीमावरती भाग असून विकासाच्या संदर्भात मागास असलेला भाग अशी या भागाची ओळख आहे. अशा भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राणा शिपिंग कंपनीचे संचालक राणा सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून होणारा हा प्रकल्प 1468 कोटी रुपयांचा असून 264 एकर मध्ये सिरोंचा अंकीसा या राष्ट्रीय महामार्गावर राजेश्वरपल्ली या भागात साकारत आहे. तिन्ही राज्याच्या सीमवरती भागातल्या आदिवासी जनतेला या भागात या प्रकल्पामुळे मोठा फायदा होणार आहे . त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळणार आहे.
या भागात एक मोठं शैक्षणिक संकुल ही उभा राहणार आहे. या भागात वैद्यकीय महाविद्यालयासह अभियांत्रिकी दंत महाविद्यालय नर्सिंग कॉलेज यासह व्यावसायिक आणि इतर अभ्यासक्रमांनी सुसज्ज असलेलं एक शैक्षणिक संकुल या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. यात आदिवासी मुलांना 75 टक्के जागा राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आला आहे.या शैक्षणिक संकुलात वस्तीगृहाची व्यवस्था सुद्धा राहणार आहे. स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वस्तीगृह मार्गदर्शन तसेच सुसज्ज लायब्ररीची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी होणार आहे.
या भागात कुठलीही आरोग्याची चांगली सोय नसल्याने नागरिकांना तब्बल 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूर अडीशे किलोमीटर अंतरावर असलेल्या हैदराबादला जावं लागते. सिरोंचा तालुका मुख्यालया पासून अडीचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या गडचिरोली आणि चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालय उपचारासाठी जाण्यासाठी ही या तालुक्यातल्या लोकांना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागला आहे. साध्या बाळंतपणाच्या शस्त्रक्रियेसाठी ही लगतच्या तेलंगणा किंवा चंद्रपूर गडचिरोलीला जावे लागण्याची परिस्थिती अनेकदा या भागातल्या लोकांवर ओढवली आहे. मोठा अपघात झाल्यानंतर वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचे जीव गेले आहेत
पुण्यातल्या रुबी सारख्या अत्याधुनिक सोयीने सुसज्ज असलेल्या रुग्णालयाचा समकक्ष असलेल्या 300 खाटांचं भव्य रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या बाह्यरुग्ण विभाग, अस्थिरोग संबंधित उपचार तसेच स्त्रियांशी संबंधित उपचार , कॅन्सर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया या रुग्णालयात उपलब्ध असणार आहेत.. या रुग्णालयात राज्य आणि केंद्र सरकारच्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून रुग्णांना उपचार घेता येणार आहे. या रुग्णालयाचा फायदा सिरोंचा तालुक्यासह दक्षिण गडचिरोली जिल्हा लगतचा छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमवरती भागाला होणार आहे.
वर्षानुवर्ष ज्या भागातल्या नागरिकांनी आरोग्य आणि शिक्षणाच्या संदर्भात उपेक्षा सहन केल्या आहेत त्या सगळ्यांना या मोठ्या शैक्षणिक आणि वैद्यकीय प्रकल्पामुळे दिलासा मिळणार आहे तसेच या प्रकल्पामुळे तीन राज्याच्या सीमवरती भाग असलेला सिरोंचा तालुका आहे विकासाच्या दृष्टीने वेगळा वळणावर जाणार आहे.
राणा शिपिंग कंपनीचे संचालक असलेले राणा सूर्यवंशी यांनी अशा मागास भागात काहीतरी करायचा निर्धार केला होता. त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांच्या संकल्पनेनुसार त्यांनी तालुक्याला भेट देऊन पाहणी केली.
सिरोंचा तालुक्याच्या विकासाचा नवा इतिहास उद्या लिहिला जाणार
या भागातली परिस्थिती पाहिल्यानंतर सामाजिक दृष्ट्या या भागात चांगल्या आरोग्याच्या सोयी आणि चांगली शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून त्याला अंतिम स्वरूप दिला. सिरोंचा तालुक्यासारख्या अतिदुर्गम भागात अशा पद्धतीचा अतिसुसज्ज रुग्णालय आणि त्यांच्या शैक्षणिक संकुल उभारण्यात येत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय स्तरावर आवश्यक असलेली सगळी मदत पुरवण्याची सूचना यंत्रणेला केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आणि राणा सूर्यवंशी यांचा पुढाकार यातून सिरोंचा तालुक्याच्या विकासाचा नवा इतिहास उद्या लिहिला जाणार आहे.
त्रासातून नागरिकांची सुटका होणार
तिन्ही राज्याच्या सीमवरती भागातल्या आदिवासी जनतेला या भागात या प्रकल्पामुळे मोठा फायदा होणार आहे . त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळणार आहे.. विशेषतः आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात एक नवा प्रकाश यामुळे पडणार आह. शैक्षणिक संकुलासह तीनशे खाटाचं अत्यंत सोयींनी सुसज्ज असं मल्टीस्पेशालिटी रुग्णालय या भागात उभारला जाणार आहे. तीन राज्याच्या सीमा भागात अशा पद्धतीचा आधुनिक रुग्णालय एकही नाही त्यामुळे लोकांना हैदराबाद , नागपूरला जावं लागतं. मात्र या ठिकाणी पुण्यातल्या रुबी सारख्या अत्याधुनिक सोयीने सुचित असलेल्या रुग्णालयाच्या समकक्ष अशा रुग्णालयाची उभारणी होत असल्यामुळे वर्षानुवर्ष या भागातल्या नागरिकांनी आरोग्य आणि शिक्षणाच्या संदर्भात जो त्रास सहन केला आहे. त्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.
राज्याचा सीमावर भाग विकासाच्या प्रवाहात
राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते या भव्य रुग्णालय आणि शैक्षणिक संकुलाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शिपिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि रुबी हॉस्पिटल चे संचालक असलेले राणा सूर्यवंशी यांच्यासह रुबी हॉस्पितलचे संचालक असलेले डॉ परवेझ ग्रँट उपस्थित असणार आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र तेलंगणा आणि छत्तीसगडचा तीन राज्याचा सीमावर भाग विकासाच्या प्रवाहात येणार आहे.
