या मोहीमेत तब्बल साडेपाचशे सी सिक्सटी कमांडोच्या जवानांनी भाग घेत भर पावसात नदीनाले पार करत 50 किलोमीटरचा येण्या-जाण्याचा पायी प्रवास केला. यासाठी घनदाट जंगलात तब्बल 48 तास राबवलेल्या या अभियानात आठ तास माओवाद्यांसोबत जवानांनी प्रत्यक्ष झुंज दिली. त्यात कंपनी दलम 10 च्या पीपीएससीएम पदावर असलेले मालू पदा यासह कंपनी दहामध्ये असलेल्या सदस्य क्रांती उर्फ जमुना आणि अहेरी दलमच्या ज्योती कुंजाम आणि गट्टा दलमच्या मगी मडकाम यांचा मृतक माओवाद्यांमध्ये समावेश आहे.
advertisement
या चारही माओवाद्यांवर १४ लाख रुपयांचे बक्षीस होते. या चकमकीत एक एसएलआर दोन इंसास आणि एक थ्री नाट थ्री या तीन बंदुकांसह ९२ जिवंत काडतुसे आणि वॉकीटॉकी जप्त करण्यात आली आहे.
जवळपास साडेपाचशे कमांडो आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक (ऑपरेशन) एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली रवाना झाले होते. जवळपास १० डोंगर चढून उतरून जवानांना ४० ते ५० किलोमीटर अंतर पार करायला लागले. २७ तारखेच्या सकाळी पोलिसांनी जंगलात जाऊन ऑपरेशन सुरू केले. आठ तास माओवाद्यांसोबत जवानांनी प्रत्यक्ष झुंज दिली. या मोहीमेत चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आम्हाला यश आले, असे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.
