गडचिरोली : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 31 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ एकत्रित जमा झाले आहे. मात्र 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही. तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे दिली.
advertisement
लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे. मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल. आतापर्यंत 70 ते 75 टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहितीही मंत्री तटकरे यांनी दिली.
अमरावतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्ही केवळ लाडकी बहीण योजनेवरच थांबलो नाही तर, ज्या गरीब मुली शिकू शकत नाही, त्यांनी 50% शुल्क भरू शकत नसल्याने काही मुलींनी आत्महत्या केली. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रात मुली आत्महत्या करत असेल तर या अर्थमंत्री पदाला काय चाटायचे सत्ता येत राहील जात राहील. माणूस जगला पाहिजे मुलगी शिकली पाहिजे. म्हणून सर्व मुलींची फीस भरण्याचा निर्णय सरकारने घेतला.
विरोधक ओरडतात की सरकारने नको त्या योजना आल्या? विरोधक लाडकी बहीण योजनेवरून टिंगल करायला लागले भावासाठी काय आणणार? 44 हजार कोटी रु शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. इथून पुढे शेतकऱ्यांना कृषी पंपाचे बिल भरावे लागणार नाही. मागच्या वीज बिलाची चिंता करू नका, ते वीस बिल माझ्यावर सोडून द्या असं अजित पवार म्हणाले.
