TRENDING:

Gachiroli News : कुणाची हिंमत नव्हती तिच्याजवळ जाण्याची, वाघीण शेवटी तडफडून मेली, गडचिरोलीतील घटना

Last Updated:

Gachiroli News : गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेच्या मालगाडीची धडक बसून 4 वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गडचिरोली, (महेश तिवारी, प्रतिनिधी) : गडचिरोली जिल्ह्यात वडसा वन विभागात असलेल्या बल्लारपूर गोंदिया रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मालवाहतूक रेल्वेच्या धडकेने 4 वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला आहे. बल्लारपूर ते गोंदिया हा रेल्वे मार्ग चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून घनदाट जंगलातून गेलेला रेल्वे मार्ग आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यात वाघांचा प्रवेश झालेला असून दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर वाघांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या रेल्वेखाली येऊन मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
सर्व पहा

जंगलातून गेलेल्या बल्लारपूर ते गोंदिया रेल्वे मार्गावर मालवाहू रेल्वेच्या धडकेने आज 4 वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला आहे. गांधीनगर गावाला ही घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकासह घटनास्थळाची भेट देऊन पाहणी केली. मृत अवस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. वृत्त झालेल्या वाघिणीचे सगळे अवयव कायम असल्याने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार या वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
Gachiroli News : कुणाची हिंमत नव्हती तिच्याजवळ जाण्याची, वाघीण शेवटी तडफडून मेली, गडचिरोलीतील घटना
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल