गणेशोत्सवाच्या काळात अनेक सार्वजनिक गणेश मंडळांकडून काही परंपरा जपल्या जातात. यात अंबरनाथमधील खाटूश्याम मित्र मंडळाचा देखील समावेश आहे. हे मित्र मंडळ बुवापाडा परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतं. यंदा या मंडळाचं 33वं वर्ष होतं. हे मंडळ दरवर्षी मोदकाचा लिलाव करतं. या मंडळाकडून दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दोन दिवस आधी एक मोठा मोदक गणपती बाप्पा जवळ ठेवला जातो. या मोदकाचा अनंत चतुर्दशीला लिलाव केला जातो.
advertisement
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनामिका त्रिपाठी या गणेश भक्ताने हा मोदक लिलावात विकत घेतला. त्यांनी या मोदकासाठी तब्बल 1 लाख 85 हजार रुपयांची सर्वोच्च बोली लावली. लिलावात विकत घेतलेला हा मोदक अनामिका आपले वडील प्रमोदकुमार चौबे यांना भेट देणार आहेत.
खाटूश्याम मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रमोदकुमार चौबे म्हणाले, "हा मोदक विकत घेणाऱ्यांवर बाप्पाची वर्षभर कृपादृष्टी राहते. हा मोदक जो भाविक विकत घेतो, त्याची भरभराट होते, अशी इथल्या स्थानिकांची श्रद्धा आहे. यातून भाविक मोठ्या संख्येने मोदक खरेदीसाठी गर्दी करत असतात. त्यामुळेच अगदी पैसे नसले तरी लोक जुळवाजुळव करून या मोदकासाठी बोली लावतात.