Spain Ganeshotsav: माद्रिदमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, मराठी बांधवांनी जपली परंपरा, बघा Photo

Last Updated:
Spain Ganeshotsav: महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात आणि जल्लोषात पार पडला. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे जगभरात परसलेले मराठी बांधव देखील ही आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात. युरोपमध्ये मोठ्या संख्येने मराठी बांधव वास्तव्याला आहेत. हे बांधव गणेशोत्सवाच्या निमित्त मराठी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. युरोपमधील महाराष्ट्र मंडळाने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला.
1/7
स्पेन राजधानी असलेल्या माद्रिद शहरात 6 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र मंडळाने सलग पाचव्या वर्षी गणेशोत्सवाचं आयोजन केलं होतं. या निमित्त गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष माद्रिदमध्ये देखील घुमला.

advertisement
2/7
या एकदिवसीय उत्सवात पालखी मिरवणूक, मूर्ती पूजा, लेझीम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामुदायिक आरती यांचा समावेश होता. माद्रिदमधील भारतीय समुदायाने 6 सप्टेंबर रोजी विसर्जनाच्या दिवशी गणेशोत्सव साजरा केला.

3/7
माद्रिदमधील महाराष्ट्र मंडळाच्या सभासद योगिता संजय लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपतीच्या पर्यावरणपूरक मूर्तीची निवड केली जाते. माद्रिदमध्ये नदी किंवा समुद्रात पारंपारिक विसर्जन शक्य नसल्याने घरीच बाप्पाचं विसर्जन केलं जातं.

4/7
कार्यक्रमाच्या दिवशी, गणरायाला निरोप देण्यासाठी संगीत आणि सामूहिक प्रार्थनांसह एक प्रतीकात्मक छोटी मिरवणूक काढली जाते. स्थानिक पर्यावरणीय आणि लॉजिस्टिक अडचणी लक्षात घेऊनच कार्यक्रमाचं आयोजनं केलं जातं.

5/7
भक्ती आणि सामुदायिक बंधनाची समान भावना आत्मसात करण्यावर महाराष्ट्र मंडळ भर देत आहे. गणेशोत्सवाच्यानिमित्त मराठी लोकांना एकत्र येण्याची संधी तर मिळतेच शिवाय जागतिक स्तरावर मराठी संस्कृती आणि परंपरांचं जतन आणि प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ देखील मिळतं.

6/7
माद्रिद येथील भारताचे कॉन्सुल जनरल आणि उदयोजक मनीष जैन यांनीही या उत्सवात सहभाग घेतला होता. रहिवासी मराठी पुजारी माधव जोगलेकर यांनी गणपति प्राणप्रतिष्ठा व आरतीची जबाबदारी पार पाडली. मुलांनी गणेश स्तुती आणि वंदना गायली तर स्थानिक स्वयंसेवकांनी अभंग सादर केले.

7/7
पारंपारिक विधी, विविध कार्यक्रमांचं सादरीकरण आणि सामुदायिक मेजवानीसाठी मराठी बांधवांनी गर्दी केली होती. ज्या देशांमध्ये भारतीय सण हे सहसा खासगी बाबी असतात, त्या देशांमध्ये महाराष्ट्र मंडळ स्थानिक नियम आणि वातावरणाशी जुळवून घेत भक्ती आणि एकता ही मुल्ये जोपासत आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement