याबाबत मिळालेली माहिती अशी की, अपघातात राजेश शेगोजी गौतम (वय 44, रा. सूर्याटोला) आणि जितेंद्र पटले (26, रा. छोटा रजेगाव) यांचा मृत्यू झाला. तर जखमींमध्ये पवन भैयालाल ठाकरे (वय 49, रा. कन्हारटोला) व राजेंद्र रहांगडाले (35, रा. दासगाव) यांचा समावेश आहे. राजेश हा व्याही पवन यांच्यासह दुचाकी क्र. एमएच 35, एयू 1982 ने फुटाळा (म.प्र.) येथे बहिणीच्या घरी लग्न समारंभासाठी जात होते. तेव्हा दासगाव रस्त्यावरील नीलज गावाजवळ दासगावच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी क्र. एमएच 35 आर 6928 ने समोरून धडक दिली. यात राजेश शेगोजी गौतम (वय 44, रा. सूर्यटोला) आणि जितेंद्र हरीविठ्ठल पटले (26, रा. छोटा राजेगाव) यांचा मृत्यू झाला.
advertisement
दुचाकींच्या अपघातात पवन भैयालाल ठाकरे (वय 49, रा. कन्हारटोला), राजेंद्र रहांगडाले (वय 35, रा. दासगाव) हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतकांना केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले तसेच जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राहुल राजेश गौतम (वय 24, रा. सूर्याटोला) यांच्या फिर्यादीवरून रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रावणवाडी पोलिस करीत आहे.
