घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोंदियात हिट अँड रन थरात बघायला मिळाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, गोरेगाव वरून गोंदियाकडे येत असताना गोंदियातील पॉलिटेक्निक कॉलेजसमोर भरधाव कारणे रोडच्या कडेला बसलेल्या दोन ट्रक ड्रायव्हर व एक सायकलस्वाराला उडवले, या घटनेत दोन ट्रक ड्रायव्हर व सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
कार चालक भर वेगाने गोंदिया शहरातील गणेशनगरकडे जात असताना ही घटना घडली आहे. खोमेश उरकुडे वय 24 वर्ष रा. कोसेटोला, गोरेगाव असे या कारचालकाचं नाव आहे. तर हेमराज राऊत वय 54 रा. कारंजा, कादीर शेख वय 38 रा. फुलचुर आणि एक सायकस्वार या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, दोघंजण रस्त्याच्या कडेला बसले आहेत. तर एक सायकस्वार रस्त्यात्याने जात असताना पाठिमागून एक भरधाव कार येते या कारने या तिघांना उडवल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
