TRENDING:

Gondia News : मित्राच्या बहिणीवर प्रेम करणं जीवावर बेतलं; माहिती मिळताच भावाकडून भयानक शेवट, गोंदिया हादरलं

Last Updated:

जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गोंदिया, 27 नोव्हेंबर, रवी सपाटे : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. प्रज्वल अनिल मेश्राम (२०, रा. कुडवा)  असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
News18
News18
advertisement

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोंदिया येथील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंडीटोला रोड, कुडवा येथील प्रज्वल अनिल मेश्राम याची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली आहे. आरोपी आणि मृत तरुण प्रज्वल हे दोघे चांगले मित्र होते. मात्र त्यानंतर प्रज्वलचे आपल्याच मित्राच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यांच्यात मोबाईलवर बोलणे सुरू झाले. आरोपी तरुणाला याबाबत कळले. त्याने मित्राला समजावले. मात्र, त्यानंतरही मित्र आणि बहिणीचे भेटणे, बोलणे सुरूच होते. त्याने आपल्या मित्राला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने प्रज्वलची हत्या झाली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'तुम्ही म्हणाल ही जादू, पण...' गौतम वैष्णव जे करते ते पाहून व्हाल थक्क
सर्व पहा

मृतक प्रज्वल आणि दोन आरोपी हे तिघेही एकमेकांचे मित्र असून यातील प्रज्वलचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. यातून प्रज्वल आणि आरोपीचा यापूर्वीही वाद झाला होता. पण त्यानंतरही प्रज्वल आणि आरोपीची बहिण यांच्यात भेटीगाठी आणि मोबाईलवर बोलणे सुरूच होते. आरोपीने प्रज्वलला परत एकदा समजविण्याच्या उद्देशाने त्याच्या कुडवा येथील घरातून बाहेर बोलावले. दोघांत वाद आणि झटापट झाली. यानंतर आरोपीने प्रज्वलला चाकूने भोसकले. यात प्रज्वलचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संकेत बोरकर (२०) व आदर्श भगत (२०) या दोघांना ताब्यात घेतलं आहे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia News : मित्राच्या बहिणीवर प्रेम करणं जीवावर बेतलं; माहिती मिळताच भावाकडून भयानक शेवट, गोंदिया हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल