घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विदेशी बनावटीची पिस्तूल, मॅगझिन व पाच जिवंत काडतुसे विकण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाकडून पोलिसांनी ते पिस्तूल, मॅगझिन व काडतूसं जप्त केली आहेत. गोंदिया शहरातील श्रीनगर परिसरातील चंद्रशेखर वॉर्डात स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. विक्रांत ऊर्फ मोनू गौतम बोरकर (28, रा. श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड) असे आरोपीचे नाव आहे.
advertisement
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेत असताना त्यांना विक्रांत बोरकर याच्याकडे पिस्तूल असल्याची व तो त्याची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्या बातमीची सत्यता पडताळून पथकाने वरिष्ठांना कळविले व विक्रांत बोरकर याच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरातून विदेशी बनावटीची पिस्तूल, मॅगझिन आणि पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. आरोपी विक्रांत बोरकर विरुद्ध शहर पोलिसांत भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 सहकलम 135 महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला जप्त पिस्तुलासह शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
