TRENDING:

Gondia News : आऊट ऑफ कंट्रोल झाली तवेरा, रस्ता सोडून घरावर आदळली, दीड वर्षांच्या चिमुकल्यासह 3 ठार, अपघाताचा Video

Last Updated:

गोंदियामधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे, या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गोंदिया, 26 डिसेंबर, रवी सपाटे : गोंदियामधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात तवेरा गाडी अनियंत्रित होऊन घराला धडकली. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतामध्ये दीड वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. लग्नाची वरात घेऊन जात असताना हा अपघात झाला आहे. तिरोडा तालुक्यातील एकोडी दांडेगाव चौकात हा अपघात झाला. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
News18
News18
advertisement

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  ओव्हरटेक करण्याच्या नादात चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटून गाडी रोडच्या कडेला असलेल्या घराला धडकली. एकोडी दांडेगाव चौकात हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दीड वर्षांच्या चिमुकल्यासह तीघांचा जागीच मृत्यू  झाला. अनुराधा ठाकरे वय 55 करटी, छाया बाई इनावते वय 55 करटीटोला, आणि देवांश मुळे वय वर्ष दीड असे या अपघातातील मृतांची नावं आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
सर्व पहा

या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी तातडीनं गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच गंगाझरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia News : आऊट ऑफ कंट्रोल झाली तवेरा, रस्ता सोडून घरावर आदळली, दीड वर्षांच्या चिमुकल्यासह 3 ठार, अपघाताचा Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल