जालन्यात दीपक बोराडे यांच्या नेतृत्वात धनगर समाजाचे आमरण उपोषण सूरू आहे. या उपोषणाला आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी भेट दिली होती. या आंदोलना दरम्यान बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
धनगर भावांना आरक्षण मिळण्यासाठी दीपक बोराडे कोणते ही ढोंग न करता आपल्यासाठी उपोषणाला बसले आहेत. आंदोलन अनेक होतात. पण त्याच आंदोनलाची चर्चा होते ज्यात खोट नसतो,असा टोला सदावर्ते यांनी जरांगे यांना लगावला.
advertisement
आई अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि भारतीय संविधानात दिलेले विचार एकच आहेत.भारतीय संविधानाच्या आर्टीकल 21 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तरतूद करून ठेवली आहे. आपण संविधानाला जोडलेले आहोत.हम फारकत वाले नाही है, संविधान से गाठ बंधे वाले है! तुमचं माझं रक्ताच नातं म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो,असे देखील सदावर्ते यांनी सांगितले.
मी याच वेळेची वाट पाहत होतो, कारण येथून सुरुवात होणार होती. सरकार माझं एकतं, कारण मी संविधानाचे बोलतो.किती जरी वयोवृद्ध असले तरी माझं ऐकावं लागतं,असे देखील सदावर्ते म्हणाले आहेत.
आमची माणसं एसटी आहेत.त्यामुळे आम्हाला एसटीचे आरक्षण दिलं असतं तर आमची भाषा पण पुढे गेली असती. पण जर तुम्ही एसटीच आरक्षण दिलं नाही तर आमची भाषा अशीच राहील. तसेच मी चपटी वाला नाही,सरकार माझं एकतं, असे म्हणत सदावर्ते यांनी जरांगे यांच नाव न घेता त्यांना टोला लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट, गिरीश महाजन तुम्ही तातडीने यंत्रणा हलवा आणि चर्चेला या.नुसतं येऊ नका तर अॅक्ट घेऊन या. हा जीआर नाही तर अॅक्ट घेऊन या.यामुळे प्रमाणपत्र मिळतील, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारकडे केली. यासोबत सगळ्याच राजकारण्यांनो धनगर से पंगा अच्छा नहीं,असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.