TRENDING:

अतिवृष्टीने 352 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, तात्काळ मदत द्या; सतेज पाटलांनी अजित पवारांकडे केली मागणी!

Last Updated:

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने 352 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत द्या. त्याचबरोबर कोल्हापूरच्या विकासासाठी अनेक...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने 352 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत द्या. त्याचबरोबर कोल्हापूरच्या विकासासाठी अनेक विकासकामांना शासनाने मंजुरी दिली आहे. पण निधीच मिळालेला नाही, त्यामुळे कामं रखडलेली आहेत, तर तो निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या केली आहे.
Kolhapur News
Kolhapur News
advertisement

कोल्हापूरच्या विकास कामांना निधी हवा

यावेळी आमदार सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनेक मागण्या केल्या आहेत. वीजेचे दर वाढल्यामुळे कोल्हापूरातील उद्योजक कर्नाटकात जात आहेत, त्यावर शासनाने योग्य निर्णय घ्यावा. कोल्हापूरात रस्ते, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा खुदाईमुळे रस्तेही खराब झालेले आहेत, त्यासाठीही निधी द्यावा. कोल्हापूरी बंधारे दुरुस्तीसाठी 130 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अंबाबाई विकास आराखडा आणि राजर्षी शाहू महाराज स्मारक आराखड्याला चालन्या द्यावी. केशवराव भोसले नाट्यगृहाचा उर्वरित निधी द्या, अशा मागण्या आमदार सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली.

advertisement

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, तातडीने मदत द्या

यंदा कोल्हापूरात जोरदार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील 352 हेक्टर शेतजमिनीतील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून, त्यासंदर्भात अहवाल शासनाकडून पाठवून नैसर्गित आपत्ती मदत निधीतून आर्थिक मदत लवकरात लवकर द्यावी. शेतकऱ्यांना बियाणे-खते अनुदानावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.

advertisement

हे ही वाचा : Yavatmal News: ग्रामपंचायत फोडली, कागदपत्रं जाळली; ग्रामसभेपूर्वीच 'या' गावात उघडकीस आला कांड!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

हे ही वाचा : Satara News: कोकणच्या चाकरमान्यांसाठी ST सज्ज; साताऱ्यातून सुटणार 200 जादा बसगाड्या, वाचा सविस्तर

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अतिवृष्टीने 352 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, तात्काळ मदत द्या; सतेज पाटलांनी अजित पवारांकडे केली मागणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल