उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावातील अपंग शेतकरी रेवण महादेव शिंदे यांनी एक एकर उडीद, एक एकर सोयाबीन तर तीन एकर कांद्याची लागवड केली होती. परंतु मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि उडीद पिकाची लागवड करण्यासाठी शेतकरी रेवण शिंदे यांना दीड लाख रुपयापर्यंत खर्च आला.तर कांद्या लागवडीसाठी दीड ते दोन लाख रुपये पर्यंत खर्च आला होता.
advertisement
सावधान! लहान मुलांनाही येतोय हृदयविकाराचा झटका; यामागे नेमकं कारण काय?
शेतीचे एवढे नुकसान झाले असूनही आतापर्यंत कोणत्याही विमा कंपनीने किंवा कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शेतात येऊन आतापर्यंत पिकाचे पंचनामे देखील केलेले नाही. मध्यंतरी पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती तेव्हा शिंदे यांनी सोयाबीन, उडीद आणि कांद्याची लागवड केली होती. लागवड केल्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कांद्याची लागवड केल्यावर जोरदार पावसाला सुरुवात झाली लावलेला कांदा संपूर्ण पाण्यात वाहून गेला. एकीकडे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसताना देखील सरकार मुक्याचा सोंग घेऊन बसतो. तर दुसरीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना बहिऱ्याचा सोंग घेऊन बसतो. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी अर्थहात अपंग बळीराजा रेवण शिंदे यांनी केली आहे