आंब्याच म्हणायचं झाल्यास देवगड हापूस आंब्याच्या नावावर कर्नाटक आंबा बाजारात विकला जातो. काजूची देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळते. कोकणातील काजूच्या नावावर आफ्रिकन काजू गर विकले जातात. यामुळे ग्राहकांची मोठी फसवूनक होते. काही ग्राहकांना कोकणातील या फळांची चव आणि ओळख नसल्याने त्यांना या मधील फरक लक्षात येत नाही. अशा ग्राहकांची फसवणूक केली जाते.
advertisement
कोकणातील काजूगर हा कसा ओळखायचा?
काजू व्यावसायिक आणि जी आय नामांकन मिळालेले व्यावसायिक सुरेश नेरुळकर यांनी सांगितलं की, "बाजारात आंबा आणि काजूच्या बाबतीत ग्राहकांची मोठी फसवणूक केली जाते. सर्व प्रथम आधी ग्राहकांनी हे समजून घेतल पाहिजे की कोकणातील आंबा, काजूला जीआय नामांकन मिळाले आहे. त्यामुळे विक्रेता ज्या वेळी काजुच्या पॅकेटची विक्री करतो. त्यावेळी त्या पॅकेटावर जी आय नामांकनाचा लोगो असणे आवश्यक आहे.
तसंच, "दुसरी गोष्ट म्हणजे कोकणातील काजू गर हा अंड्या सारखा थोडासा पिवळंसर रंगाचा असतो. तर आफ्रिकन गर हा पांढराशुभ्र रंगाचा असतो. त्या गराच्या पॅकेटवर जीआय नामांकनाचा लोगो नसतो. चुकनही असा लोगो विक्रेत्याने घातल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळेच ग्राहकांना कोकणातील काजू गर ओळखायचा असल्यास या दोन पद्धतीचा अवलंब करून ओळखता येऊ शकतो." असंही सुरेश नेरुळकर यांनी सांगितलं.