TRENDING:

शेती,शिक्षणासाठी उपयोगी पडणारे कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचे? नियम काय आहे?

Last Updated:

Kunbi Caste Certificate : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा थेट लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा थेट लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत या प्रक्रियेबाबत प्रशासन सक्रिय झाले असून, पात्र अर्जदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जिल्हा प्रशासनानेही खात्री दिली आहे की, नियमांनुसार अर्ज केलेल्या कोणालाही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनावश्यक विलंब होणार नाही.
Kunabi certificate
Kunabi certificate
advertisement

अर्ज कसा करायचा?

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन सादर करावा लागतो. त्यासाठी ‘आपले सरकार पोर्टल’ (https://aaplesarkar.mahaonline.gov.in

) हे अधिकृत व्यासपीठ आहे. अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून, आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तहसील कार्यालयात सादर करावी लागते. यामुळे ऑनलाईन नोंदणी आणि प्रत्यक्ष पडताळणी या दोन्ही टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण होते.

कोणती कागदपत्रे लागतील?

advertisement

अर्जदाराला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. जसे की,

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र (ओळख व पत्ता पुरावा)

जमिनीचे जुने रेकॉर्ड (7/12, 8-A उतारा)

कुणबी असा उल्लेख असलेले जुने सरकारी दाखले

वंशावळ किंवा कौटुंबिक इतिहास दर्शवणारे पुरावे

शाळा सोडल्याचा दाखला, ज्यात जात स्पष्ट नोंदवलेली आहे

advertisement

पालक किंवा आजोबांच्या नावावर आधीपासून अस्तित्वात असलेले जात प्रमाणपत्र

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ज्या अर्जदारांकडे ही सर्व कागदपत्रे योग्य आणि पूर्ण स्वरूपात असतील त्यांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

कुणबी प्रमाणपत्राचे फायदे काय?

कुणबी प्रमाणपत्र हे एखाद्या व्यक्तीच्या जातीचा अधिकृत पुरावा आहे. यामुळे

शेतकऱ्यांना कृषी अनुदान व शासकीय योजना मिळतात.

advertisement

विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रवेश व शिष्यवृत्ती मिळते.

स्पर्धा परीक्षांमध्ये आरक्षणाचा लाभ होतो.

शासकीय नोकरीमध्ये राखीव जागांसाठी पात्रता मिळते.

सहकारी संस्था व बँकांच्या योजनांमध्ये प्राधान्य मिळते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेती,शिक्षणासाठी उपयोगी पडणारे कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचे? नियम काय आहे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल