या स्टॉलमध्ये इंडोनेशिया, कुवेत, झांबिया, नेपाळ, दुबई, फिलिपिन्स यांसारख्या देशांमधील चलनही विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे स्टॉल केवळ विक्रीपुरते मर्यादित नसून नागरिकांना आपल्याकडे असलेली जुनी नाणी आणि नोटा विकण्याचीही संधी येथे दिली जाते. विक्री केलेल्या नाण्यांच्या आणि नोटांच्या बदल्यात रोख रक्कमही देण्यात येते.
advertisement
विशेष म्हणजे येथे उपलब्ध असलेली नाणी आणि नोटा केवळ दुर्मीळच नाहीत तर सर्वसामान्य खरेदीदारांसाठी सुलभ दरात उपलब्ध आहेत. 50 रुपयांपासून सुरू होणारे दर हे 2000 रुपयांपर्यंत जातात त्यामुळे इतिहास आणि नाणे संकलनाचा छंद असणाऱ्या सर्व वयोगटातील लोकांसाठी हे स्टॉल एक आदर्श ठिकाण ठरते.
या स्टॉलची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ग्राहक ऑनलाईन माध्यमातूनही नाणी आणि नोटा मागवू शकतात. इच्छुकांनी 9004566226 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून नाणी आणि नोटांची माहिती मिळवू शकते.
इतिहासप्रेमी, नाणे संकलक, तसेच दुर्मीळ गोष्टींच्या शौकिनांसाठी हा स्टॉल एक खजिनाच ठरतो आहे. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या स्टॉलला भेट देऊन अनेकांनी आपला छंद जपण्याची संधी घेतली आहे.