Success Story: गायीच्या शेणापासून अनोखा व्यवसाय, सावंत दाम्पत्यानं वर्षाला 50 लाख कमावले!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
दैनंदिन जीवनात आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध व्हावेत या उद्देशाने त्यांनी गाईच्या शेणापासून ऑरगॅनिक अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम सुरू केला. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
मुंबई: अनेक जण व्यवसाय करण्याला प्रधान्य देत आहेत. उपासना सावंत आणि अजित सावंत या दाम्पत्याने निसर्गाशी एकरूप होत स्वतःचा खास व्यवसाय उभारला आहे. दैनंदिन जीवनात आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध व्हावेत या उद्देशाने त्यांनी गाईच्या शेणापासून ऑरगॅनिक अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम सुरू केला. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
अजित सावंत मूळचे मनोरंजन क्षेत्रात दिग्दर्शनाच्या कामाशी जोडलेले होते, तर उपासना सावंत एका कॉर्पोरेट कंपनीत कार्यरत होत्या. स्वतःचा व्यवसाय सुरू करावा अशी त्यांची नेहमीच इच्छा होती. सुरुवातीला त्यांनी केकचा व्यवसाय सुरू केला, पण त्याचबरोबर काही वेगळं आणि समाजोपयोगी करता यावं, यासाठीही ते सतत प्रयत्नशील होते. अशातच लॉकडाऊन आला आणि ऑरगॅनिक उत्पादनांची वाढती मागणी त्यांनी ओळखली.
advertisement
घराघरात रोज लावली जाणारी अगरबत्ती ही आरोग्यास अपायकारक रसायनांमुळे धोकादायक ठरू शकते, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गाईच्या शेणापासून नैसर्गिक पद्धतीने अगरबत्ती बनवण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. यासाठी अजय सावंत यांनी विविध ठिकाणी जाऊन अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि स्वतःची छोटी फॅक्टरी सुरू केली.
advertisement
गोशाळांतून मिळणाऱ्या गाईच्या शेणाचा वापर करून आणि नैसर्गिक सुगंध मिश्रित करून त्यांनी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी अगरबत्ती बाजारात आणली. सावंत दाम्पत्याचा विश्वास आहे की, जेव्हा आपण निसर्गाला हानी न पोहोचवता काम करतो, तेव्हा निसर्गही आपल्याला साथ देतो. आज त्यांच्या या उपक्रमामुळे अनेकांना शुद्ध आणि सुरक्षित अगरबत्ती उपलब्ध होत आहे. त्यांच्या या कल्पक प्रयत्नांना मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास 50 लाखांपर्यंत पोहोचले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 5:54 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story: गायीच्या शेणापासून अनोखा व्यवसाय, सावंत दाम्पत्यानं वर्षाला 50 लाख कमावले!