advertisement

Pune Food: 27 वर्षांची परंपरा, पुण्यात प्रसिद्ध अस्सल झणझणीत मिसळ, तुम्ही चाखलीये का चव?

Last Updated:
पुणे शहर केवळ शिक्षणाचे केंद्र नसून, येथे खाद्यसंस्कृतीलाही एक वेगळी ओळख आहे. पुण्यात हे मिसळ हाऊस मिसळप्रेमींचे आवडते ठिकाण आहे.
1/7
पुणे शहर केवळ शिक्षणाचे केंद्र नसून, येथे खाद्यसंस्कृतीलाही एक वेगळी ओळख आहे. याच पुण्याच्या एरंडवणे भागात गेली 27 वर्षे कार्यरत असलेले पुणे मिसळ हाऊस हे मिसळप्रेमींचे आवडते ठिकाण आहे. सायकलवरून सुरू झालेला हा खाद्यप्रवास आज थार गाडीपर्यंत पोहोचला आहे.

2/7
या व्यवसायाची सुरुवात 1998 साली आबा काळे यांच्या आजोबांनी केली. शिरूर तालुक्यातील एका छोट्या गावात शेती आणि दुग्ध व्यवसाय करताना त्यांनी सायकलवरून चहा, शेव-चिवडा विकण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी मिसळ तयार केली आणि तिची विक्रीही सुरू केली. आज या व्यवसायाला 27 वर्षांचा वारसा लाभला आहे.

3/7
पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी पुणे मिसळ हाऊस सुरू केले. ही आता त्यांच्या तिसऱ्या पिढीकडे आहे. व्यवसायात सातत्याने नवे प्रयोग करत त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांतील मिसळीचा अभ्यास केला.

4/7
कोल्हापूर, नाशिक यासारख्या ठिकाणी जाऊन स्थानिक चव समजून घेतली. त्यातून पुणेरी रस्सा मध्यम तिखट आणि कोल्हापुरी रस्सा झणझणीत तयार झाले.

5/7
पुणे मिसळ हाऊसमध्ये क्लासिक मिसळ थाळी आणि बाजीराव मिसळ थाळी या दोन खास थाळ्या मिळतात. क्लासिक थाळीत फरसाण, कांदा, लिंबू, मटकी, पाव, तसेच दोन्ही रस्स्यांचा समावेश असतो. तर बाजीराव थाळीत मिसळीबरोबर ताक आणि तूपही दिले जाते.

6/7
आज पुणे मिसळ हाऊस हे केवळ एक खाद्यपदार्थ ठिकाण नसून, तो एक सांस्कृतिक वारसा आहे. अनेक परदेशी पर्यटक, खवय्ये, सेलिब्रिटी, तसेच चित्रपटसृष्टीतील अभिनेतेही या मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी येथे येतात.

7/7
मिसळची किंमत केवळ 90 रुपयांपासून सुरू होते, अशी माहिती आबा काळे यांनी दिली. सायकलवरून सुरू झालेला हा प्रवास आज पुण्याच्या खाद्यनकाशावर एक ठसा उमटवत आहे.

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement