कारागृहात असताना उमेदवारी अर्ज भरता येईल का? आणि तो कायदेशीरदृष्ट्या वैध ठरेल का? असे प्रश्न उपस्थित होत असतानाच हा अर्ज न्यायालयाच्या निर्देशानुसार भरल्याचे स्पष्टीकरण शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा त्यांच्या पत्नी सरिता कोल्हे यांनी दिले.
शिंदेंकडून कोल्हे कुटुंबात तिघांना तिकीट!
सरिता कोल्हे यांनी ललित कोल्हे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून, शिवसेना शिंदे गटाकडून केवळ ललित कोल्हेच नव्हे तर त्यांचा मुलगा पियुष कोल्हे आणि सासूबाई माजी नगरसेविका सिंधुताई कोल्हे यांनाही उमेदवारी देण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे कोल्हे कुटुंबातील तीन सदस्य निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
advertisement
माझे पती विजयी गुलाल उधळतील, सरिता कोल्हे यांना ठाम विश्वास
दरम्यान, ललित कोल्हे सध्या कारागृहात असले तरी त्यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी आपण सांभाळणार असल्याचेही सरिता कोल्हे यांनी स्पष्ट केले. तसेच मतदारराजा ललित कोल्हे यांच्यामागे ठामपणे उभे राहतील , असा विश्वास सरिता कोल्हे यांनी व्यक्त केला.
माजी महापौर ललित कोल्हे धुळे कारागृहातून, जळगाव कारागृहात!
बोगस कॉल सेंटर प्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून ललित कोल्हे हे कारागृहात असून, न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना धुळे कारागृहातून, जळगाव कारागृहात हलविण्यात आले होते. तेथेच त्यांनी उमेदवारी अर्जासंदर्भातील सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आज त्यांचा अर्ज महापालिका निवडणुकीसाठी दाखल करण्यात आला.
