जालना जिल्ह्यातील मंगळूर येथे ही घटना घडली होती. इम्रान सय्यद नावाचा मुलगा खेळत असताना त्याच्या पाठीत खिळा घुसला होता. या घटनेनंतर त्याला तातडीने जालना येथील संजीवनी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यावेळी सूरूवातील डॉक्टरांनी इम्रान सय्यदची तपासणी केली होती.या तपासणीत हा खिळा आरपार घुसल्याने किडनी जवळील धमण्यांपर्यंत पोहोचला होता.त्यामुळे ही घटना पाहून पहिल्यांदा डॉक्टरही चक्रावले होते.त्यामुळे मुलावर उपचार करणे म्हणजे डॉक्टरांसमोर मोठी जोखिम होती. ही जोखिम स्विकारत डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी उपचार केले.दरम्यान आज त्याला सुट्टी झाल्यानंतर त्याच्या आईने डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
advertisement
या घटनेवर डॉक्टर म्हणाले की, सायकलच्या चाकासारखा एक आणि मोठा खिळा आरपार घुसला होता. त्याची तपासणी केली असता हा खिळा मणक्यापर्यंत गेलेला नसून आरपार पोटात आणि किडनीपर्यंत गेला होता. किडनीच्या रक्तवाहिन्या जवळ तो जाऊन थांबलेला आहे.त्यामुळे हा खिळा काढण सोप्प नव्हतं. डॉ. अतुल काळे न्यूरोसर्जन,डॉ.तुषार अग्रवाल न्यूरोसर्जन, डॉ. अविनाश सुरवसे जनरल सर्जन या सगळ्या टीममुळे एकत्र येऊन रात्रीत सर्जरी केली.त्याच्या प्रत्येक अवयवाला वाचवत ही मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आता त्याचे प्राण वाचले आहेत.