जोरदार पावसाने हजेरी लावली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवासाठी जालना शहराच्या सिंधी बाजारात अनेक व्यापाऱ्यांनी गणपतीच्या मूर्तींचे स्टॉल लावले आहेत. अनेक विक्रेत्यांनी आपल्या मूर्ती झाकण्यासाठी आणि स्वतःच्या आसऱ्यासाठी पत्र्याचे तात्पुरते शेड उभारले होते. सोमवार दुपारनंतर जालना शहरात अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे काही विक्रेते आणि नागरिक या पत्र्याच्या शेडखाली थांबले होते.
advertisement
जोरदार विजेचा धक्का
याच वेळी, शेडमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरला आणि मितेश बिधानिया यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुनमुन नवमहलकर या मुलीलाही शॉक लागला. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. तातडीने दोघांनाही रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मितेश बिधानिया यांना मृत घोषित केले. मुनमुनवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
मूर्ती विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेमुळे सिंधी बाजारात आणि मूर्ती विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या शेडमध्ये वीज कशी उतरली याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.