मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश मोरे नावाचा व्यक्ती आपल्या एका साथीदारासोबत संभाजीनगर रोडवरील बिस्मिल्ला हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला होता. जेवण झाल्यानंतर हॉटेल मालक मन्सूर खान आणि त्यांचा सहकारी फरदीन खान यांनी जेवणाचे बिल मागितले. पण अविनाशने बिल देण्यास नकार दिला. याच कारणावरून आरोपी अविनाश मोरे आणि त्याच्या साथीदारासोबत हॉटेल मालकाचा वाद झाला.
advertisement
हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी धारदार चाकूने मन्सूर खान आणि फरदीन खान यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेदरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहींनी मध्यस्थी करत आरोपींना पकडलं. आणि दोन्ही जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
या घटनेदरम्यान, उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत एका आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुख्य आरोपी अविनाश मोरे याला अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार मात्र फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
