TRENDING:

Kalyan News : आधी लोखंड आता फ्राईड राईसमध्ये झुरळ, रामदेव हॉटेलचा धक्कादायक निष्काळजीपणा

Last Updated:

कल्याण मधील नामांकित रामदेव हॉटेलने हलगर्जी पणाचा कळस गाठला आहे. कारण हॉटेलच्या जेवणामध्ये झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याआधी जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळला होता

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Kalyan News : प्रदिप भांगे,कल्याण : कल्याण शहरातील प्रसिद्ध रामदेव हॉटेलमधील जेवणात झुरळ आढळल्याची घटना घडली आहे. एका महिलेने पार्सल फ्राईड राईस घेतला होता. त्या फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याची चिड आणणारी घटना घडली आहे.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना घडली होती.त्यानंतर ही घटना ताजी असतानाच आता फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
kalyan news
kalyan news
advertisement

मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत निकिता जाधव या रामदेव हॉटेलमध्ये फ्राई़ड राईस पार्सल घेण्यासाठी गेल्या होत्या.आपल्या मुलीसाठी त्यांनी हे जेवण घेतले होते.त्यानंतर घरी जाऊन त्यांनी जेवण उघडून पाहिले असता त्यांना फ्राई़ड राईसमध्ये झुरळ आढळल्याचे  दिसून आले होते. त्यानंतर निकिता जाधव यांनी हॉटेलमध्ये येऊन संबंधित घटनेची तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता.पण हॉटेल मालकांनी त्यांना उडवा उडवीची उत्तर दिली.

advertisement

त्यानंतर निकिता जाधव माध्यमांना या घटनेची माहिती दिली. तसेच माझ्या मुलींनी तो फ्राईड खाल्ला असता आणि तिला जर काही झाले असते तर या गोष्टीला जबाबदार कोण असंत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच यावर हॉटेल व्यवस्थापकांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ही घटना वाचून नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे. तसेच हॉटेल मालक नागरीकांशी जीवीताशी खेळत असल्याचा आरोप होत आहे.

advertisement

या प्रकरणात अद्याप तरी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नाही आहे.मात्र या घटनेने नागरीकांना प्रचंड चीड येते आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan News : आधी लोखंड आता फ्राईड राईसमध्ये झुरळ, रामदेव हॉटेलचा धक्कादायक निष्काळजीपणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल