जिगर आणि ऋतिका त्यांच्या 8 महिन्यांच्या मुलीसह हुबळीला गेले होते. समाजाने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याला नाकराने दाम्पत्य आणि त्यांची मुलगी शुक्रवारी सकाळी कार (MH 09 FV 3877) ने हुबळीला पोहोचले. विवाह सोहला पार पडल्यानंतर नाकराने दाम्पत्य पुन्हा कोल्हापूरला घरी यायला निघालं, पण रस्त्यामध्येच कोगनोळी चेकपोस्ट नाक्याजवळ पावती फाडण्यासाठी उभ्या असलेल्या कंटेनर (RJ 14 GG 9017) ला नाकराने यांनी धडक दिली. जिगर यांची कार वेगात असल्यामुळे कारच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे.
advertisement
नाकराने यांच्या कारने कंटेनरला धडक दिल्यानंतर त्यांच्या कारच्या एअरबॅग ओपन झाल्या आणि स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंटेनरला धडकल्यानंतर नाकराने दाम्पत्य गंभीर जखमी झालं, पण मागच्या सिटवर बसलेली त्यांची 8 महिन्यांची मुलगी वृष्टी हिला किरकोळ दुखापत झाली. अपघात झाला तेव्हा वृष्टी पाळण्यामध्ये झोपली होती.
अपघाताची माहिती मिळताच तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि चेकपोस्ट वरच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नाकराने दाम्पत्याला कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण रात्री साडेआठच्या सुमारास ऋतिकाचा आणि मध्यरात्री जिगरचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिगर यांचे नातेवाईक किमजी नाजी पटेल यांनी कंटेनरचा ड्रायव्हर इम्तिहास अनवर अली (राहणार राजस्थान) याच्याविरोधात निपाणी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
जिगर नाकराने यांचं कागलच्या फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये प्यालवूड आणि लाकडी दरवाजाचा व्यवसाय होता. मूळचे गुजरातच्या कच्छचे रहिवासी असलेलं नाकराने कुटुंब मागच्या बऱ्याच वर्षांपासून कोल्हापूरमधील पाचगाव रोडवरील शिवराई हाईट्समध्ये राहत होतं.
