नेमकं प्रकरण काय?
मिरजेत ८ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर रस्त्यावरील नीलजी बामणी येथे पुलाखाली एकजण बनावट नोटा विक्रीसाठी आल्याची माहिती गांधी चौक पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सुप्रीत काडापा देसाई नावाच्या तरुणाला पकडलं. पोलिसांनी त्याच्याकडून ४२ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. पोलिसांनी देसाईची कसून चौकशी केली असता कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार इब्रार आदम इनामदार याच्या कसबा बावडा येथील 'सिद्धकला' नावाच्या दुकानात बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती दिली.
advertisement
पोलिसांनी चहाच्या टपरीत धडक घेतली असता चहाच्या दुकानात कलर झेरॉक्स मशीनवर बनावट नोटा छापण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. इनामदार याच्या दुकानातून कलर झेरॉक्स मशीन, नोटा मोजण्याचे मशीन, स्कॅनर, प्रिंटर जप्त करण्यात आले. आरोपींकडून ५०० व २०० रुपयांच्या १ कोटी किमतीच्या बनावट नोटांही जप्त केल्या आहेत.
या रॅकेटचा म्होरक्या आदम इनामदार हा कोल्हापूर पोलीस दलात वाहनचालक म्हणून काम करत होता. त्यानेच अशाप्रकारे बनावट नोटा छापण्याचं रॅकेट सुरू होतं. तर सुप्रीत देसाई, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे, सिद्धेश म्हात्रे या चारजणांमार्फत इब्रार इनामदार हा बनावट नोटा वितरण करत होता. आरोपी राहुल जाधव काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात तुरुंगात गेला होता. त्यावेळी तेथील एका आरोपीकडून त्याने बनावट नोटा छापण्याची कला शिकून घेतली होती. हे सर्व आरोपी ५०० रुपयांच्या खऱ्या नोटेच्या बदलेत १५०० हजार रुपयांच्या बनावट नोटा देत होते. पण पोलिसांनी त्यांचा पर्दाफाश केला आहे. पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सर्वांना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.