TRENDING:

तुम्ही कधी पिलाय का बीटाचा गुलाबी चहा? पाहा मिळतोय कुठे

Last Updated:

या ठिकाणी सध्या एका वेगळ्या चहाची चर्चा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर, 25 सप्टेंबर : चहा प्यायला अनेकांना आवडतो. कामानिमित्त घराबाहेर असणारे अनेक जण रस्त्याच्याकडेला चहाच्या गाड्यावरच्या चहा पायाला पसंती देतात. पण, कोल्हापुरात सध्या एका वेगळ्या चहाची चर्चा आहे. तो म्हणजे बीट पावडर वापरून केलेला गुलाबी अमृततुल्य चहा. कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयाच्या जवळच्या चौकात हा खास चहा मिळू लागला आहे.
News18
News18
advertisement

सीपीआर चौकात कसबा बावड्याकडे जाणाऱ्या रोडवर अगदी सिग्नलच्या शेजारीच हे गुलाबी अमृततुल्य चहाचे छोटेसे दुकान आहे. संतोष कुमार नवले यांनी हे चहाचे दुकान सुरू केले आहे. याआधी ते फुलांचे डेकोरेशन करण्याचा व्यवसाय करत होते. ते स्वतः चहाप्रेमी असल्यामुळे त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला आहे. 

कोल्हापूरच्या मामा-भाच्याचा फेमस वडापाव, वडाच्या झाडाशी आहे खास कनेक्शन

advertisement

सध्या जागोजागी आपल्याला अमृततुल्य चहा पाहायला मिळत असतो. मात्र आपल्याला अमृततुल्य पेक्षा काहीतरी वेगळा चहा असावा म्हणून मग हा गुलाबी रंगाचा चहा बनवण्याचा विचार संतोष नवले यांच्या डोक्यात आला. त्यासाठी त्यांनी मग विचार सुरू केला. त्यात सेंटेड पावडर किंवा रंग वापरून असा रंग न आणण्याचे त्यांनी ठरवले होते. खरंतर गुलकंद किंवा गुलाबाच्या पाकळ्यांपासून हा गुलाबी रंग मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण शेवटी त्यांनी बिटाचा वापर करूनच हा गुलाबी रंग आणण्याचे ठरवले आणि तो विचार सत्यात देखील उतरवल. 

advertisement

बीटापासून मिळवला गुलाबी रंग..

चहामध्ये बीट वापरून रंग आणण्यासाठी संतोष यांनी बीटाची पावडर करुन चहा मध्ये वापरली आहे. यावेळी बीट असल्यामुळे चहाची चव बदलणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. अमृततुल्य चहाचा मसाला आणि त्यातच मिसळलेली बीट पावडर असे मिश्रण नवले आपल्या एका मित्राकडून बनवून घेतात.

नाशिकमधील फेमस ज्युसची 65 वर्षांपूर्वीची किंमत माहिती आहे का? बसणार नाही विश्वास

advertisement

असा बनतो गुलाबी अमृततुल्य चहा..

1) एक लिटर दुधापासून हा गुलाबी चहा बनवताना सर्वात आधी दूध उकळत ठेवले जाते.

2) दुधाला उकळी आल्यावर त्यामध्ये एक पाऊच चहा पावडर, साखर, इलायची, चहाचा मसाला आणि बीट पावडर असे मिश्रण मिसळले जाते.

3) हे मिश्रण टाकल्यावर पुन्हा एकदा उकळी द्यावी लागते.

advertisement

4) त्यानंतर त्यामध्ये फक्त एक छोटा ग्लास साखर टाकावी लागते. (चहाच्या मसाल्यात देखील थोडी साखर मिसळलेली असते.)

5) मग चहा मस्त उकळला जातो.

6) साधारण 5 मिनिटे चहा उकळल्या नंतर त्याला छान गुलाबी रंग प्राप्त होतो. तसेच मस्त सुगंधही दरवळू लागतो.

7) हा वाफाळणारा चहा मग ग्राहकांना प्यायला दिला जातो.

दरम्यान चहा म्हटलं की नेहमीच्या साधारण चॉकलेटी रंगाची सर्वांना सवय पडलेली आहे. त्यामुळे हा गुलाबी रंग असणारा चहा पाहिला की बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. पण रंग प्राप्त होण्यासाठी थोडीशी बीट पावडर असून याव्यतिरिक्त चवीच्या बाबतीत या अमृततुल्य चहामध्ये काहीही वेगळं नाहीय. तसेच चहाची चव उत्तम असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केलीय.

कधी द्राक्ष बागेत मिसळ खाल्ली का? ही आहेत नाशिकमधील टॅाप 3 ठिकाणं

पत्ता :

गुलाबी अमृततुल्य चहा, केबीन नं. 2, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाजवळ, कोल्हापूर - 416002

वेळ : सकाळी 6 ते रात्री 9

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
तुम्ही कधी पिलाय का बीटाचा गुलाबी चहा? पाहा मिळतोय कुठे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल