कधी द्राक्ष बागेत मिसळ खाल्ली का? ही आहेत नाशिकमधील टॅाप 3 ठिकाणं
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मिसळ हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. नाशिकमधील मिसळ खायची असेल तर या 3 ठिकाणांना पहिली पसंती असते.
भारतात प्रत्येक भागात वेगवेगळी खाद्य संस्कृती आहे. महाराष्ट्रातही प्रत्येक ठिकाणचे काही खास पदार्थ प्रसिद्ध आहेत. मिसळ हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ असला तरी प्रत्येक भागात बनवण्याची पद्धत भिन्न आहे. नाशिकमध्ये मिसळवर ताव मारण्याचा विचार असेल तर आपल्यासाठी 3 उत्तम पर्याय आहेत.
advertisement
नाशिकमधील साधना मिसळ प्रसिद्ध आहे. चुलीवरची मिसळ म्हणूनही या मिसळला ओळखले जाते. नाशिकमधील बार्दान फाटा या ठिकाणी मटकीची मिसळ फरसाणासोबत दिली जाते. एकाच ताटात कांदा आणि लिंबू त्याचबरोबर अनलिमिटेड रस्सा आणि तर्री, मोठे पापड, दोन आकाराचे जंबो पाव आणि अगदी लहान दही डिश अशी ही मिसळ आहे. खवय्ये आवर्जून या ठिकाणी येत असतात.
advertisement
advertisement
advertisement